मुश्रीफांच्या घोटाळ्यात पहिल्यांदाच शरद पवारांना ओढलं, किरीट सोमय्यांनी थेट नाव घेतलं

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. त्यानंतर सोमय्यांनी कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.

मुश्रीफांच्या घोटाळ्यात पहिल्यांदाच शरद पवारांना ओढलं, किरीट सोमय्यांनी थेट नाव घेतलं
Sharad Pawar, Kirit Somaiya


कोल्हापूर : “हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले, त्याचा हिशेब अजून का दिला नाही? शरद पवार साहेब ही तुमची व्यूहरचना आहे का?” असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारला आहे. सेनापती घोरपडे कारखाना आणि या कारखान्यात 50 कोटींचे व्यवहार झाले आहेत. हे सरकार शरद पवार चालवतात. त्यामुळे याची माहिती त्यांना आहे. हे सरकार पवार आणि ठाकरे चालवतात. गृहमंत्री राष्ट्रवादीचे आहेत, मग किरीट सोमय्यांनी जेरबंद कुणी केलं? असंही त्यांनी विचारलं.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये (Karad) उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने (Mahalaxmi Express) कोल्हापूरला (Kolhapur) निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. त्यानंतर सोमय्यांनी कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.

किरीट सोमय्यांचे आरोप काय?

“मूळ विषय आहे की हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले, त्याचा हिशेब अजून का दिला नाही? शरद पवार साहेब ही तुमची व्यूहरचना आहे का? मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो.” असं सोमय्या म्हणाले.

गडहिंगल्ज कारखान्यात घोटाळ्याचा आरोप

“मी पुन्हा सांगतो, सरसेनापती घोरपडे कारखान्यात 98 कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे 2 कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे. मुश्रीफांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, 100 कोटी रुपये घेतले. गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार” असं सोमय्या म्हणाले.

“मुश्रीफांचे जावई बेनामी कंपनीचे मालक”

“मी उदाहरण देतो. 2020 मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिडींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत 7185 शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, 998 मतीन हसीनचे, तर 998 गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे 98 टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी 2019-20 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.”

“आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार. सेनापती घोरपडे कारखाना आणि या कारखान्यात 50 कोटींचे व्यवहार झाले आहेत. हे सरकार शरद पवार चालवतात. त्यामुळे याची माहिती त्यांना आहे. पवार आणि ठाकरे सरकार चालवतात. गृहमंत्री राष्ट्रवादीचे आहेत, मग किरीट सोमय्यांनी जेरबंद कुणी केलं?” असा सवाल सोमय्यांनी केला.

“2020 मध्ये हा कारखाना ब्रिक्स इंडिया या कंपनीला देण्यात आला. सहकार मंत्रालयाने दिला. ब्रिक्स इंडिया ही बेनामी कंपनी आहे. यामध्ये 98 टक्के शेअर कॅपिटल कलकत्त्याच्या शेल कंपन्यांतून आले. यामध्ये दोनच पारदर्शक शेअरधारक आहेत 1-1 टक्क्यांचे ते हसन मुश्रीफ यांचे जावई. ब्रिक्स आणि सरसेनापती कारखान्यात 50 कोटींचे व्यवहार झालेत. हे व्यवहार अपारदर्शी आहेत. हे लिलाव कोणत्या पद्धतीने झाले, किती लिलावात सहभागी झाले हे सर्व अपारदर्शी आहेत.” असा आरोपही सोमय्यांनी केला.

संबंधित बातम्या :

गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा, हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांचा दुसरा हल्ला, उद्या तिसरा घोटाळा बाहेर काढणार

हसन मुश्रीफांनी आणखी 100 कोटींचा घोटाळा केला, सोमय्यांचा दुसरा हल्ला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI