महाविकास आघाडीतील आणखी 3 बड्या नेत्यांची घोटाळे बाहेर काढणार, किरीट सोमय्यांची घोषणा, रडारवर आता कोण?

3 बड्या नेत्यांच्या घोटाळ्याची प्रकरणं बाहेर काढणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीतील आणखी 3 बड्या नेत्यांची घोटाळे बाहेर काढणार, किरीट सोमय्यांची घोषणा, रडारवर आता कोण?
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर सहकारी साखर कारखान्याला किरीट सोमय्या यांनी भेट दिली

अहमदनगर: महाविकास आघाडी सरकारमधील आणखी 3 बड्या नेत्यांच्या घोटाळ्याची प्रकरणं बाहेर काढणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत राज्य सरकारमधील मंत्री सोमय्यांच्या टार्गेटवर असणार आहे. राज्यातील सरकार हे गुंड आणि माफियांचं आहे म्हणत, त्यांचे ठेकेकार हे सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता अशा गैरव्यवहाराच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असल्याचा दावा सोमय्यांनी केला. ( BJP leader Kirit Somaiya’s announcement that corruption cases of 3 big leaders in the Mahavikas Aghadi government will be brought out )

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर सहकारी साखर कारखान्याला किरीट सोमय्या यांनी भेट दिली, आणि हा साखर कारखाना कुणामुळे आजारी पडला हे लवकरच समोर येईल असं सांगितलं. या कारखान्याबाबत ईडीने जोरदार तपास सुरु केला आहे, त्यामुळे लवकर यातून सत्य बाहेर येईल असं सोमय्या म्हणाले. यावेळी त्यांनी कारखान्याचे कामगार आणि शेतकऱ्यांकडून प्रकरणाची अधिक माहिती घेतली.

भागवत कराड यांनी लक्ष्य घालण्यास सांगितलं

पारनेर सहकार साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी एक कृती समिती मला येऊन भेटली आणि तिने मला याबाबत सगळी माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी मला या प्रकरणात लक्ष्य घालण्यास सांगितलं. त्यामुळे मी इथं आलो असं सोमय्या म्हणाले. दरम्यान, या कारखान्याच्या घोटाळा प्रकरणात आधी राष्ट्रवादीत असलेले आणि आता भाजपवासी झालेल्या काही नेत्यांचा सहभाग असल्याचं समोर येत असल्याचं पत्रकारांनी सोमय्यांना विचारलं. त्यावर पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही, मी प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आलो असल्याचं म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

पाटीलांची किंमत सव्वा रुपये माझी 550 कोटी

दरम्यान, या पत्रकार परिषदेत सोमय्याना अब्रुनुकसानीच्या दाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, ‘माझ्यावर आतापर्यंत साडे पाचशे कोटी रुपयांचे अब्रुनुकसानीचे देवा आहे. संजय राऊत यांनी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर फक्त सव्वा रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा केला, मात्र माझ्यावर साडेपाचशे कोटींचे दावे, प्रदेशाध्यक्षांहून माजी किंमत जास्त करुन, मला माझ्याच पक्षात अडचणीत आणता का?’ असा सवाल सोमय्यांनी विचारला. संजय राऊत यांनी मी तक्रार केल्यानंतर 55 लाख रुपये परत केले, म्हणजे त्यांनी 55 लाखांची चोरी केली होते, आणि हीच संजय राऊत यांची किंमत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

पवार, ठाकरे आणि त्यांच्या शिष्यांमुळे राज्यात हाहा:कार

कोल्हापुरात झालेल्या कारवाईवरुन किरीट सोमय्यांना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ‘कोल्हापुरात पोलिसांनी जी वागणूक दिली, त्याबद्दल मी मुंबई पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे, अंबाबाईचं दर्शन घेण्यापासून मला थांबवण्यात आलं, त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहे. ठाकरे-पवार हे ठेकेदार आणि त्यांचे चेले एकत्र आल्याने राज्यात हाहाकार माजला आहे. सामान्य माणूस कुणाकडेही तक्रार करु शकत नाही, मी कुणालाही घाबरत नाही, कितीही धमक्या आल्या, अटक झाली तरी मी माझं काम सुरुच ठेवणार’ असल्याचं सोमय्या म्हणाले.

हेही वाचा:

‘दिल्लीवरुन फोन आल्यानं राज्यपालांनी सही केली असेल’, नाना पटोलेंचा खोचक टोला

राज्यसभेसाठी भाजपा काँग्रेससोबत सौदेबाजी करतंय का? फडणवीसांचं पहिल्यांदाच खणखणीत उत्तर

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI