AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील जनतेसाठी महाविकासआघाडी हा एक त्रास : नितेश राणे

MPSC परीक्षेच्या नवीन तारखेवरुन भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले आहे. (Nitesh Rane On MPSC exam New Date)

राज्यातील जनतेसाठी महाविकासआघाडी हा एक त्रास : नितेश राणे
उद्धव ठाकरे आणि नितेश राणे
| Updated on: Mar 12, 2021 | 3:55 PM
Share

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची (MPSC exam) नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. MPSC परीक्षेच्या नवीन तारखेवरुन भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले आहे. राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे,” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. (Nitesh Rane On MPSC exam New Date)

“राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी”

“हॉलतिकीट कशाला काढली. विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन ढासळलं आहे. त्यांचं नुकसान झालं तर ते सरकार भरून देणार का? राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.

“विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. जेव्हा भ्रष्टाचार करायचा असतो. टेंडर पास करायचे असते, तेव्हा सरकारमधील लोकांचा ताळमेळ चांगला असतो, राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे,” अशी टीकाही नितेश राणेंनी केली.

“सचिन वाझेंची चौकशी झाली पाहिजे”

“मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी न्याय मिळवून द्यायचा असेल तर सचिन वाझेंची चौकशी झाली पाहिजे. अँटिलियाच्या बाहेर नेमकं काय झालं, हे जर आपल्याला खरंच जाणून घ्यायचं असेल तर सचिन वाझेंची चौकशी आणि अटक झालीच पाहिजे. हे नेमकं अतिरेकी प्रकरण आहे की खंडणीचा विषय आहे हे बाहेर यायला हवं,” असे नितेश राणे म्हणाले.

एमपीएससी परीक्षा 21 मार्चला 

दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. MPSC ची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आता हे विद्यार्थी सरकारचा 21 मार्च रोजीचा निर्णय स्वीकारणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या परीक्षेसाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरातील केंद्रांच्या ठिकाणी वास्तव्याला येऊन राहिले आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना राहण्याचा आणि खाण्याचा खर्च करावा लागत आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे विद्यार्थी 21 तारखेच्या परीक्षेचा निर्णय कितपत मान्य करणार, हे आता पाहावे लागेल. मुळात सरकारने 21 तारखेला परीक्षा घेण्याच्यादृष्टीने तयारी केली असले तर मग ती 14 तारखेला का होऊ शकत नाही, असा सवाल अनेक विद्यार्थी विचारत आहेत. काहीवेळापूर्वीच MPSC विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयावर भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हेदेखील पाहावे लागेल. (Nitesh Rane On MPSC exam New Date)

संबंधित बातम्या : 

संजय राठोडांचं मंत्रिपद मला द्या म्हणणाऱ्या नेत्याला बंजारा महंतांचा विरोध, म्हणाले…

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांविरोधात स्वाभिमानी आक्रमक, साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

VIDEO : आधी गुडघा टेकला, मग पुष्पगुच्छ, नंतर अश्रूंचा बांध फुटला, तरुणीच्या प्रपोजचा व्हिडीओ होतोय व्हायरल

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.