घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेणाऱ्यांना काहीच कळणार नाही, प्रवीण दरेकरांचा टोला

झोपलेल्या सरकारला जाग करण्याचं काम मी करणार आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.  (Pravin Darekar on farmer loss due to heavy rains) 

घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेणाऱ्यांना काहीच कळणार नाही, प्रवीण दरेकरांचा टोला

परभणी : “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर भाजपा टोकाची भूमिका घेऊन सरकार विरोधात संघर्ष करेल,” असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. “आघाडी सरकारचे मंत्री घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेत आहेत. पण घरात बसून त्यांना काहीच कळणार नाही,” असा टोलाही दरेकरांनी लगावला. प्रवीण दरेकर सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. तिथेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. (Pravin Darekar on farmer loss due to heavy rains)

“राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारचे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम होते. अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करुन त्यांच्या खात्यात पैसे जमा करायला पाहिजे होते. पण आता सप्टेंबर महिना संपला तरी एक दमडीही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. झोपलेल्या सरकारला जाग करण्याचं काम मी करणार आहे,” असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

“फडणवीस सरकारने गेल्यावर्षी कोकण, कोल्हापुरातील महापुरात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी मदत दिली होती. घराच्या पडझडीसाठी, जनावरांना मदत देण्यासाठी स्वतंत्र GR काढून मदत दिली होती. मराठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे, अहवाल देण्यात वेळ घालवण्यापेक्षा किमान या GR नुसार तरी मदत करावी,” असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

“आघाडी सरकारचे मंत्री घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेत आहेत. पण घरात बसून त्यांना काहीच कळणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या गावात गेले, तरच समस्या कळतील आणि त्यावर उपाययोजना होतील. शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा मानसिकतेत आहेत. त्यांना धीर आणि दिलासा देण्यासाठी शासनाने पावले उचलावीत. जी काही मदत द्यायची ती वेळेत द्यावी. आता रब्बीची पेरणी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी उभारणी मिळेल,” असेही दरेकर म्हणाले.  (Pravin Darekar on farmer loss due to heavy rains)

संबंधित बातम्या : 

Hathras | योगी सरकारचे CBI चौकशीचे आदेश, गुन्हेगारांना पाठिशी घातले जाणार नाही- रावसाहेब दानवे

दिग्विजय सिंह यांची सुवर्ण पदक विजेती शूटर कन्या भाजपमध्ये

Published On - 8:50 am, Mon, 5 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI