AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या नेत्यांना पेंग्विन एवढीही किंमत नाही, उद्धव ठाकरे यांनी घेतला खरमरीत समाचार

राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू मुंबई महानगर पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आल्यानंतर त्यांची पहिली जाहीर सभा नाशिक येथे झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत चौफेर टीका केली.

भाजपच्या नेत्यांना पेंग्विन एवढीही किंमत नाही, उद्धव ठाकरे यांनी घेतला खरमरीत समाचार
Uddhav thackeray in nashik rally
| Updated on: Jan 09, 2026 | 10:43 PM
Share

नाशिक ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे. येथे भविष्यात जी पिढी येईल त्यांना राम कोणत्या वनात राहत होते हे दाखवण्यासाठी वन तरी शिल्लक राहाणार आहे का असा सवाल शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की आज बंगालमध्ये ममता बॅनर्जी हुकूमशाही विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. मग आपण का शेपूट घालून बसलो आहोत असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, याचे सरकारमध्ये आता यांच्यात भांडणे सुरु आहेत. गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच. मिंधे कोण पूर्वाश्रमीचा आपला. गद्दार. नाईक आणि शिंदेत आता लागली आहे. गणेश नाईक म्हणतात मिंध्यांनी एफएसआयचा घोटाळा केला. भाजपने परवानगी दिली तर मिंध्यांचा टांगा उलटा करतो. अरे टांगा कशाला उलटा करता. टांगात टांगा घालू नका असाही मिश्किल सल्ला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की आम्ही मुंबईत होर्डिंग लावल्या. होय आम्हीच केलं. कोस्टल रोड शिवसेनेनेच केला असेही ते म्हणाले.

यांची पेंग्विन एवढीही किंमत नाही

‘आज तुडुंब गर्दी झाली. एक तरी भाड्याचा माणूस आहे का. मुंबईत जिजामाता उद्यान आहे. दहा वर्षापूर्वी आम्ही पेंग्विन आणले. आमच्यावर टीका केली. आज पेंग्विन बघायला पैसे देऊन गर्दी करत आहे. यांच्या सभाला पैसे देऊन लोक येत नाहीत. यांची पेंग्विन एवढीही किंमत नाही असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

ही बोगस मोदी गॅरंटी नाही !

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की आज बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हुकूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर बंगाल रस्त्यावर उतरला आहे. मग आपण शेपूट घालून बसणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. ते पुढे म्हणाले की हा वचनामा आहे. हा छापलेला रंगीत कागद नाही. हा ठाकरेंचा शब्द आहे. ही बोगस मोदी गॅरंटी नाही. ठाकरे जे बोलतात ते करतात. आम्ही कुणाच्या कामाचं श्रेय घेत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी केली.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.