‘रोहित पवार कामामध्ये कधीकधी, श्रेय घेण्यात मात्र सगळ्यात आधी’, गोपीचंद पडळकरांचा जोरदार टोला

श्रीगोंदा, कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधीकधी तर क्षेय घेण्यात मात्र सर्वात आधी असतात, असा टोला पडळकरांनी लगावलाय.

'रोहित पवार कामामध्ये कधीकधी, श्रेय घेण्यात मात्र सगळ्यात आधी', गोपीचंद पडळकरांचा जोरदार टोला
गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 5:50 PM

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका करणारे भाजप आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. श्रीगोंदा, कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधीकधी तर क्षेय घेण्यात मात्र सर्वात आधी असतात, असा टोला पडळकरांनी लगावलाय. आपणच मुख्यमंत्री असल्याप्रमाणे रोहित पवार केंद्र सरकारवर बोलतात. पण आपल्याच मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याकडे त्यांचं लक्ष नसतं, अशी टीकाही पडळकर यांनी केलीय. (Gopichand Padalkar criticizes Rohit Pawar)

रोहित पवार हे शरद पवार यांचं सुधारित व्हर्जन आहे. गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल, अशा शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवलाय. महाविकास आघाडीमध्ये सगळा सावळा गोंधळ सुरु आहे. एका खात्याचा मंत्री दुसऱ्याच खात्याचा निर्णय जाहीर करतो. एखाद्या मंत्र्याने कुठला निर्णय घेतला तर तो मित्रपक्षाला मान्य नसतो. राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेनं कधीही अनुभवला नव्हता, अशी घणाघाती टीका पडळकरांनी केलीय. बारातमी अॅग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कोंबड्यांच्या खाद्याने मोठं नुकसान झाल्याची तक्रार एका तरुणाने आपल्याकडे केली असल्याचं पडळकर म्हणाले.

‘आघाडी सरकार आरक्षणविरोधी, मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत’

राज्यातील आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावरून या सरकारने मोठं षडयंत्र रचलं आहे, असा गौप्यस्फोट करतानाच सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर चौंडी येथे आले होते. अहिल्यादेवी होळकर यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हा आरोप केला. राज्य सरकार ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. आरक्षणावरून सरकारचं मोठं षडयंत्र आहे, अशी टीका पडळकर यांनी केली. हे सरकार निष्क्रीय आहे. कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही. सरकारमधील मंत्रीच आरक्षणावरून वाद पेटवत आहेत, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

काका-पुतण्यासमोर काँग्रेसचे नेते मान डोलवताहेत

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसही सत्तेसाठी लाचार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्राचीही ते दखल घेत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. पदोन्नतीतील आरक्षणासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देऊ असा इशारा दिला होता. त्याचं काय झालं? काँग्रेस नेत्यांना कोणतीही लाज राहिली नाही. बारामतीच्या काका-पुतण्यासमोर काँग्रेसचे नेते नुसती मान डोलवत आहेत. यांचं सरकारमध्ये काहीच चालत नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

“अजित पवारांना गर्व झाला होता, तो मोडून काढला”; पंढरपूर मंगळवेढ्याच्या विजयानंतर गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

आघाडी सरकार आरक्षणविरोधी, मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत; गोपीचंद पडळकरांचा आरोप

Gopichand Padalkar criticizes Rohit Pawar

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.