मनसेच्या मोर्चासाठी भाजप आमदाराच्या गाड्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चासाठी भाजपकडून बस गाड्या देण्यात आल्या असल्याचे सांगितलं (BJP give buses for mns morcha) जात आहे.

मनसेच्या मोर्चासाठी भाजप आमदाराच्या गाड्या
Follow us
| Updated on: Feb 09, 2020 | 8:50 AM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चासाठी भाजपकडून बस गाड्या देण्यात आल्या असल्याचे सांगितलं (BJP give buses for mns morcha) जात आहे. आज (9 फेब्रुवारी) मनसेचा मुंबईत बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल (BJP give buses for mns morcha) होत आहेत.

मनसेचे पुण्यातील कार्यकर्तेही मोर्चासाठी येण्यास निघाले आहेत. विशेष म्हणजे यासाठी ज्या बस वापरल्या आहेत. त्या बसेस भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या असल्याचे म्हटलं जात आहे. या बसेसवर आमदार महेश लांडगे यांचे नावही दिसत आहेत. तसेच कार्यकर्त्यांसोबत भाजपचेही काही कार्यकर्ते आहेत, अशी माहिती मिळत आहे.

कसा असेल मनसेच्या मोर्चाचा मार्ग?

दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील होतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील.

शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.

आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता होईल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.