AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या प्रकृतीसाठी ‘भाजपवासी’ जावयाकडून साकडं

अजितदादा लवकरच कोरोनावर मात करुन जनसेवेत कार्यरत व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना !" अशी पोस्ट भाजप आमदार राहुल कुल यांनी लिहिली

अजित पवारांच्या प्रकृतीसाठी 'भाजपवासी' जावयाकडून साकडं
| Edited By: | Updated on: Oct 31, 2020 | 7:28 PM
Share

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर अजित पवारांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी सर्वच पक्षातून सदिच्छा व्यक्त होत आहेत. अजित पवार यांचे आत्तेजावई आणि भाजप आमदार राहुल कुल यांनीही प्रार्थना केली आहे. (BJP MLA Rahul Kool wishes speedy recovery of Father in law Ajit Pawar who tested COVID Positive)

“राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त आणि नियोजनमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त कळाले. राज्यातील गोरगरीब जनतेचे आशीर्वाद दादांच्या पाठीशी आहेत, अजितदादा लवकरच कोरोनावर मात करुन पुन्हा जनसेवेत कार्यरत व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना !” अशी फेसबुक पोस्ट राहुल कुल यांनी लिहिली आहे. राहुल कुल यांनीही काही महिन्यांपूर्वी कोरोनावर मात केली आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी ती निगेटिव्ह आली होती. मात्र कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. रुटीन चेकअपसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात गेले असता त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर ते रुग्णालयात अ‍ॅडमिट झाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजनमंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा मा. ना. अजितदादा पवार साहेबांना कोरोनाची लागण…

Posted by Rahul Subhash Kool on Monday, 26 October 2020

राहुल कुल आणि अजित पवार यांचे नाते काय?

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या सख्ख्या आत्या आहेत. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील राजेनिंबाळकर या घराण्याचं मोठं प्रस्थ आहे. हे कुटुंब उस्मानाबादच्या पाटील कुटुंबीयांशी संबंधित आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही उस्मानाबादच्या पाटील कुटुंबातील सदस्य आहेत. वडगाव निंबाळकर येथील विजयसिंह उर्फ कुमारराजे निंबाळकर हे त्यांचे चुलत बंधू आहेत. तर कांचन कुल या विजयसिंहांच्या कन्या.

कांचन कुल यांनी बारामतीजवळच असलेल्या शारदानगर शैक्षणिक संकुलात आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलंय. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या त्या पत्नी आहेत. कांचन यांच्या लग्नासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत कुल कुटुंबीयांशी सोयरीक जुळवली होती. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या भगिनी अर्थात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कांचन कुल यांनी भाजपच्या तिकीटावर बारामतीतून आव्हान दिलं होतं. त्यामुळे एकप्रकारे नात्यांमधील लढत पाहायला मिळाली होती. मात्र त्यावेळी सुळेंनी आपली खासदारकी कायम राखली होती.

संबंधित बातम्या : 

दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा, सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना सदिच्छा

बारामतीच्या लेकीलाच भाजपची उमेदवारी, कांचन कुल आणि पवार कुटुंबाचं नातं काय?

(BJP MLA Rahul Kool wishes speedy recovery of Father in law Ajit Pawar who tested COVID Positive)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...