AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगणार? उर्वरित दोन सामन्यात गणित जर तर वर…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात दक्षिण अफ्रिकेने दणका दिला आहे. भारताला 76 धावांनी पराभूत केल्याने उपांत्य फेरीचं गणित कठीण केलं आहे. त्यामुळे भारताला आता दोन सामन्यात नुसता विजय मिळवून चालणार नाही.

T20 WC 2026: टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगणार? उर्वरित दोन सामन्यात गणित जर तर वर...
T20 WC 2026: टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगणार? उर्वरित दोन सामन्यात गणित जर तर वर...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 22, 2026 | 10:44 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताची लढत दक्षिण अफ्रिकेशी झाली. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम गोलंदाजी आली. भारताची येथेच खऱ्या अर्थाने वाट लागली. कारण कर्णधार सूर्यकुमार यादवलाही प्रथम फलंदाजी करायची होती. पण तसं झालं नाही. दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 7 गडी गमवून 187 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ सर्व गडी बाद 111 धावाच करू शकला. भारताने हा सामना 76 धावांनी गमावला आहे. खरं तर दक्षिण अफ्रिकेने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा वचपा काढला असं म्हणायला हरकत नाही. कारण या सामन्यात भारतीय संघाला कुठेच भारी पडू दिलं नाही. त्यामुळे भारताचा नुसता पराभवच नाही तर नेट रनरेटचाही फटका बसला आहे. भारताने हा सामना मोठ्या फरकाने गमवल्याने -3.800 नेट रनरेट झाला आहे. त्यामुळे भारताची पुढच्या सामन्यात कसोटी लागणार आहे. खरं तर या स्पर्धेतून बाद होईल अशीच स्थिती आहे. कारण भारताला आता दक्षिण अफ्रिका वगळून इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे.

भारताला आता उपांत्य फेरीत पोहोचणं कठीण होणार आहे. कारण भारताला नुसतं जिंकून नाही नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. त्यामुळे भारताची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. भारतासमोर आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. या दोन्ही सामन्यात विजय मिळवून नाही. तर नेट रनरेट सुधारण्यावरही जोर द्यावा लागणार आहे. कारण भारताने तसं केलं नाही तर पदरात 4 गुण असूनही उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार नाही. त्यामुळे भारतीय संघाला सुपर 8 फेरीतच गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांना मोठ्या फरकाने पराभूत करणं भाग आहे.

भारत आणि झिम्बाब्वे सामना आता 26 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात भारताच्या कामगिरीवर सर्व काही अवलंबून असणार आहे. जर भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर आणि तरच स्पर्धेत राहील. अन्यथा सामन्यातून गाशा गुंडाळण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.