राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

इंदुरीकर महाराज जे बोलले आहेत, ते गुरुचरित्र, भगवद्गीतेमध्ये सप्रमाण सांगितलं आहे' असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.

राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा
Follow us
| Updated on: Feb 16, 2020 | 3:51 PM

बीड : पीसीपीएनडीटीए कायदा आणि इंदुरीकर महाराज जे बोलले, त्याचा काय संबंध लावला या लोकांनी? मला राज्य सरकारची कीव करावीशी वाटते, असं म्हणत भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी इंदुरीकर महाराजांवरील वादात उडी (BJP MLA supports Indurikar Maharaj) घेतली. महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत धसांनी इंदुरीकरांना समर्थन दर्शवलं आहे. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पुत्रप्राप्तीसंदर्भात ‘ऑड-इव्हन’चं वक्तव्य केल्याने ते अडचणीत आले होते.

‘पीसीपीएनडीटीए कायदा आणि महाराज जे बोलले, त्याचा काय संबंध लावला या लोकांनी? मला राज्य सरकारची कीव करावीशी वाटते. या सरकारने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे. वारकरी संप्रदायाच्या पताका हाती घेऊन संपूर्ण राज्यभर त्यांचं कीर्तन ऐकलं जातं. ते जे बोलले आहेत, ते गुरुचरित्र, भगवद्गीतेमध्ये सप्रमाण सांगितलं आहे’ असं सुरेश धस म्हणाले.

‘उठसूट एकाच धर्माच्या मागे लागायचं. आधी शनि मंदिराच्या पाठी, आता इंदुरीकर महाराज, त्या अनुषंगाने जर कोणी काही बोललं, तर राज्य सरकार त्याला नोटीस पाठवणार असेल, तर सरकारच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते. नोटीसनंतरपुढील कारवाई केली, तर ते अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल. आम्ही शंभर टक्के इंदुरीकर महाराजांच्या पाठिशी आहोत.’ असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj controversy) अडचणीत सापडले आहेत. पीसीपीएनडीटीए (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act) कायद्याअंतर्गत त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे. या वादानंतर इंदुरीकर महाराज अत्यंत उद्विग्न असल्याचं दिसत आहे. बीड आणि अहमदनगरमध्ये झालेल्या कीर्तन सोहळ्यात, इंदुरीकर महाराजांनी आता कीर्तन बास, शेती करु असं म्हटलं होतं.

कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करुन अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून इंदुरीकर महाराजांना ओळखलं जातं. अनोख्या रोखठोक शैलीमुळे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होत असते. पण, इंदुरीकर महाराजांनी थेट पुत्रप्राप्तीसंदर्भात वक्तव्य केल्यानं, वादाला तोंड फुटलं आहे. त्याचा परीणाम आता थेट त्यांच्या कीर्तनांवर होऊ लागला आहे. या वादात आता पुढे काय काय घडतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार (BJP MLA supports Indurikar Maharaj) आहे.

संबंधित बातम्या :

आखाडा : सम-विषम तारखेवर लिंग कसं ठरतं? लोकांना हसवणारे इंदुरीकर महाराज अडचणीत

इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

इंदुरीकर महाराजांचा वाढदिवस सोहळा, सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.