‘भाजपनं जे विष दुसऱ्या पक्षांना दिलं होतं, त्याचीच चव आता त्यांना चाखावी लागतेय’

भविष्यात एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे इतर अनेकजण भाजपमधून इतर पक्षात जातील, असे भाकीत अस्लम शेख यांनी वर्तविले. | Aslam Shaikh

'भाजपनं जे विष दुसऱ्या पक्षांना दिलं होतं, त्याचीच चव आता त्यांना चाखावी लागतेय'
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 2:08 PM

मुंबई: भाजपने आजवर दुसऱ्या राजकीय पक्षांना जे विष दिलं, त्याचीच चव आता त्यांना चाखावी लागतेय, अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली. भाजपने एकनाथ खडसे यांच्यासारख्या तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नेत्याला डावलले आणि दुसऱ्यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे भविष्यात एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे इतर अनेकजण भाजपमधून इतर पक्षात जातील, असे भाकीत अस्लम शेख यांनी वर्तविले. (Aslam Shaikh criticises BJP on backdrop of Eknath Khadse NCP joining)

दोन दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी भाजपला खडे बोल सुनावले. भाजपने आजवर दुसऱ्या राजकीय पक्षांना जे विष पाजले, त्याचीच फळे आज त्यांना चाखावी लागत असल्याचे शेख यांनी म्हटले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीमंत्रिपद सोपवले जाणार, असे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडायला तयार नाही, अशी माहिती आता पुढे येत आहेत. तसेच खडसे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी स्वत:चे स्थान सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हेदेखील अनुत्सुक असल्याचे समजते. याविषयी अस्लम शेख यांना विचारणा करण्यात आली. त्यावर एकनाथ खडसे यांना कोणते मंत्रिपद द्यावे याबाबत अंतिम निर्णय शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.

संघ-भाजपच्या विचारसरणीचे खडसे राष्ट्रवादीत कसं काम करतील?, नवाब मलिक म्हणतात….

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, गेली 40 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीत वाढलेले खडसे राष्ट्रवादीत रमतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. हृदय परिवर्तन हे होतच असतं. त्यांचं हृदय परिवर्तन झालेलं आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसेंनी स्वत: केलेल्या उद्योगांचा विचार करावा, भाजपचा पहिला थेट हल्ला

एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल; भाजपचा पलटवार

“शिवसेना इगो सोडून खडसेंना कृषिमंत्रीपद देईल का हा प्रश्नच”

(Aslam Shaikh criticises BJP on backdrop of Eknath Khadse NCP joining)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.