"शिवसेना इगो सोडून खडसेंना कृषिमंत्रीपद देईल का हा प्रश्नच"

शिवसेना हे कृषीमंत्रीपद सोडायला तयार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडही आपलं मंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यामुळे महाविकासआघाडीतील अंतर्गत धुसफूस समोर येत आहे.

"शिवसेना इगो सोडून खडसेंना कृषिमंत्रीपद देईल का हा प्रश्नच"

मुंबई : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत त्यांना काय पद मिळणार यावर सध्या राजकीय वातावरण पेटलं आहे. खडसे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. मात्र, त्यांना नेमकं कोणतं पद मिळणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. शिवसेना हे कृषीमंत्रीपद सोडायला तयार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडही आपलं मंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यामुळे महाविकासआघाडीतील अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. (ShivSena will leave ego and give post for eknath Khadse read inside story)

अशात शिवसेना आणि एकनाथ खडसे यांचा जुना वाद सगळ्यांनाच माहित आहेत. त्यामुळे आपला इगो आणि नाराजी बाजूला ठेवत शिवसेना खडसेंना पद देणार का असा सवाल राजकीय विश्लेशक संजय भोकरे यांनी उपस्थित केला आहे. यात दादा भुसे खडसेंसाठी पद सोडण्यासाठी तयार असल्याची चिन्ह आहेत. कारण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे असं दादा भुसे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे असंही संजय भोकरे म्हणाले.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा एकही आमदार, खासदार दिसणार नाही – अनिल पाटील

का आहे शिवसेनेची खडसेंवर नाराजी?

खरंतर, 2014 साली घटस्थापनेच्या काही दिवसांआधी एकनाथ खडसे यांनी भाजप-शिवसेना युती तुटल्याची घोषणा केली होती. 25 वर्षांची भाजप आणि शिवसेनेची मैत्री संपुष्टात आल्याचं खडसेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. तेव्हापासून शिवसेना खडसेंवर नाराज आहे. शिवसेनेच्या मागण्यांमुळे ही युती संपली होती. त्यामुळे खडसे आणि शिवसेनेत अंतर वाढत गेलं. (ShivSena will leave ego and give post for eknath Khadse read inside story)

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू

अशात आता महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे आपला इगो बाजूला ठेवून शिवसेना आपलं पद खडसेंसाठी देणार का ? हा मोठा प्रश्न आहे. तर यामध्ये दुसरी बाजू अशी की भाजपशी काडीमोड झाल्यानंतर शिवसेना सगळ्यात मोठा शत्रू आता भाजपच आहे.

खडसेंच्या राजीनाम्यामुळे भाजपला आधीच दणका बसला आहे. पण आता भाजप सरकारला नामोहरण करण्यासाठी शिवसेना खडसेंना जागा देईल का? किंवा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकणार का? असे प्रश्न संजय भोकरे यांनी उपस्थित केले आहेत.

पीकअपच्या भीषण अपघातात दुचाकीस्वारांनी दिला मृत्यूला चकवा, थरकाप उडवणारं CCTV फूटेज

(ShivSena will leave ego and give post for eknath Khadse read inside story)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *