मोठी बातमी: भाजप खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

उदयनराजे भोसले सिल्व्हल ओकवर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. | Udayanraje Bhosale Sharad Pawar

मोठी बातमी: भाजप खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
शरद पवार आणि उदयनराजे भोसले

मुंबई: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे दाखल झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआय चौकशीचे संकट ओढावल्यानंतर सध्या राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली सुरु आहेत. त्यासाठी सिल्व्हर ओकवर बैठकी सुरु आहेत. अशातच उदयनराजे भोसले सिल्व्हल ओकवर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.  (BJP Satara MP Udayanraje Bhosale at Silver oak to meet Sharad Pawar)

मात्र, उदयनराजे भोसले याठिकाणी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले. काहीवेळ शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतर उदयनराजे सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले. यानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. यावेळी उदयनराजे भोसले यांना अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. मात्र, त्यावर बोलण्यास उदयनराजे भोसले यांनी नकार दिला.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर लवकरच आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सध्या शरद पवार सिल्व्हर ओकवर आराम करत आहेत.

मात्र, परमबीर सिंह यांच्या पत्रासंदर्भात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आरोप दिल्यानंतर शरद पवार घरातूनच का होईन पण पुन्हा सक्रिय झाले आहेत. कालच अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख त्यांना भेटायला आले होते. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपादचा राजीनामा सोपवला होता.

मविआ सरकार सुप्रीम कोर्टात जाणार

या सगळ्यानंतर आता महाविकासाघाडी सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज सकाळपासून पुन्हा सिल्व्हर ओकवरील घडामोडींना वेग आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार काहीवेळापूर्वीच याठिकाणी आले होते. ते आता सिल्व्हर ओकवरून बाहेर पडले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या :

सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं; मविआ सरकार सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात दंड थोपटणार?

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

अनिल देशमुखप्रकरणात पहिल्यांदाच शरद पवारांचं नाव, अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या, भलेही तुम्ही मोठे मराठा नेते असाल

(BJP Satara MP Udayanraje Bhosale at Silver oak to meet Sharad Pawar)