भाजपच्या पहिल्या विद्यमान आमदाराचा पराभव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Maharashtra Assembly Election Result) सुरू असून भाजपच्या पहिल्या विद्यमान आमदाराचा पराभव (BJP sitting MLA defeated) झाला आहे.

भाजपच्या पहिल्या विद्यमान आमदाराचा पराभव

परभणी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Maharashtra Assembly Election Result) सुरू असून भाजपच्या पहिल्या विद्यमान आमदाराचा पराभव (BJP sitting MLA defeated) झाला आहे. परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले आहेत. वरपूडकर यांनी भाजपचे विद्यमान आमदार विजय फड यांचा पराभव केला केला. आता अंतिम आकडेवारी आणि निवडणूक आयोगाची औपचारिक अधिकृत घोषणाच बाकी आहे. या निकालाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.

मागील निवडणुकीत मोहन फड हे पाथरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर आमदार मोहन फड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत खासदार संजय जाधव यांच्याशी वितुष्ट आल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला.

जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे तर महानगर पालिका काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पाथरी, जिंतूर, पालम नगरपालिका राष्ट्रवादीच्या तर गंगाखेड काँग्रेसच्या ताब्यात आहे. सेलू,मानवत आणि सोनपेठ या नगरपालिका भाजपच्या, तर पूर्णा, मानवत ह्या दोन नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. 9 पैकी 5 पंचायत समित्या आघाडीच्या ताब्यात आहेत तर 4 युतीच्या ताब्यात आहेत.

परभणी जिल्ह्यातील नेते

बाबजानी दुऱ्हानी – राष्ट्रवादी- विधानपरिषद सदस्य
विजय भांबळे- राष्ट्रवादी काँग्रेस –आमदार, जिंतूर
डॉ. मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस- आमदार,गंगाखेड
मोहन फड- भाजप आमदार- पाथरी
राहुल पाटील- शिवसेना आमदार,परभणी
विपलव बाजोरिया- शिवसेना,विधानपरिषद सदस्य-हिंगोली/परभणी
संजय हरिभाऊ जाधव – शिवसेना, खासदार परभणी

1) पाथरी विधानसभा (Pathri Vidhan Sabha constituency)
एकूण मतदार-3 लाख 33हजार 594
पुरुष -1 लाख 74 हजार 144
महिला-1 लाख 59 हजार 394

2014 ला पडलेली मते

(01) मोहन फड -69 हजार 081 (भाजप)

(02) सुरेश वरपुडकर-55 हजार 632 (कॉग्रेस)

(03) अब्दुला खान-46 हजार 304 (राष्ट्रवादी)

(04) मिराताई रेंगे -35 हजार 408

मोहन फड विजयी –69 हजार 081 (भाजप)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *