भाजपाचे लोकसभेसाठी राज्यात ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान; तर विधानसभा निवडणुकीसाठी ‘हा’ प्लॅन

भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. 'मिशन 45 'च्या पार्श्वभूमीवर आता राज्यात भाजपाच्या वतीने 'धन्यवाद मोदीजी' अभियान राबवण्यात येणार आहे.

भाजपाचे लोकसभेसाठी राज्यात 'धन्यवाद मोदीजी' अभियान; तर विधानसभा निवडणुकीसाठी 'हा' प्लॅन
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 12:08 PM

मुंबई : भाजपाने (BJP) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची (Election) जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘मिशन 45 ‘च्या पार्श्वभूमीवर आता राज्यात भाजपाच्या वतीने ‘धन्यवाद मोदीजी’ (Narendra Modi) अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाला 2 ऑक्टोबरपासून  सुरुवात होणार आहे. या अभियानातंर्गत भाजपाच्या वतीने केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधण्यात येणार आहे. तसेच अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण दहा लाख पत्र पाठवण्याचं नियोजन राज्य भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

निर्मला सीतारमण यांचा दौरा

‘मिशन 45’ च्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या भाजपकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमन यांनी हा दौरा आयोजित केला होता.

विधानसभेची तयारी

एकीकडे भाजपाकडून राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. मात्र त्याचबरोबर भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू केल्याचं पहायला मिळत आहे.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकएक मतदारसंघ पिंजून काढा अशा सूचना भाजप पक्षश्रेष्ठींकडून मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजप मंत्र्यांकडून दौरे आयोजीत केले जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे भाजपाचे ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान?

भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात धन्यवाद मोदीजी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा लाख पत्र देखील पाठवण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.