राज्यात 62 हजाराहून अधिक अंध मतदार

विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात 62 हजार 366 अंध मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. जवळपास 23 हजार 101 मतदान केंद्रांवर नोंदणी झाली (Blind Voters In Maharashtra Assembly election) आहे.

राज्यात 62 हजाराहून अधिक अंध मतदार
Namrata Patil

|

Oct 19, 2019 | 8:15 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात 62 हजार 366 अंध मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. जवळपास 23 हजार 101 मतदान केंद्रांवर नोंदणी झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदार सहभागी होणार आहेत. या दिव्यांग मतदारांमध्ये 38 हजार 763 मूकबधीर, हालचाल करण्यास अक्षम असे व्यंग असलेले 1 लाख 76 हजार 615 आणि अन्य स्वरुपाचे 1 लाख 18 हजार 929 दिव्यांग यांचा समावेश (Blind Voters In Maharashtra Assembly election) आहे.

राज्यातील 96 हजार 661 मतदान केंद्रांपैकी 65 हजार 483 मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात 17 हजार 957 मतदान केंद्रावर मूकबधीर, 42 हजार 905 मतदान केंद्रावर हालचाल करण्यास अक्षम असे दिव्यांग आणि 20 हजार 465 हजार मतदान केंद्रावर अन्य स्वरुपाचे व्यंग असलेल्या मतदारांची नोंद झाली आहे.

या सर्व मतदान केंद्रांवर किमान अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मतदान खोलीपर्यंत सुलभतेने जाण्यासाठी रॅम्प, इव्हीएमवर ब्रेल भाषेतील मतपत्रिका, व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था असेल. त्यांना मदत करण्यासाठी ‘दिव्यांग मित्र स्वयंसेवक’ असतील. दिव्यांग मतदारांना सुलभ निवडणुकीचा आनंद मिळेल यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत (Blind Voters In Maharashtra Assembly election) आहेत.

1 लाखांहून अधिक व्हीव्हीपॅटचा वापर

विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक- व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) 288 मतदारसंघात पाठवण्यात आले आहेत.

या निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील 96 हजार 661 मतदान केंद्रावर, 1 लाख 80 हजार मतदान यंत्र (ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन), 1 लाख 27 हजार नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट) आणि 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक) आणि राखीव यंत्रेही पाठविण्यात आली आहेत.

निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट महत्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून सर्वप्रथम 2019 च्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें