चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष व्हावेत ही अमित शाहांची इच्छा?

संभाजी पाटील निलंगेकर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्ह्णून ओळखले जातात. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली आहे.

चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष व्हावेत ही अमित शाहांची इच्छा?

मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची नावं चर्चेत आहेत. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष व्हावेत ही भाजपाध्यक्ष अमित शाहांची इच्छा आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजी पाटील निलंगेकर प्रदेश अध्यक्षपदी बसावेत ही इच्छा आहे. संभाजी पाटील निलंगेकर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्ह्णून ओळखले जातात. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली आहे.

चंद्रकांत पाटील आणि अमित शाह यांचे संबंध चांगले आहेत. अमित शाह यांच्या पत्नीचं माहेर कोल्हापूर आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची नेहमीच जवळीक असते. राज्य मंत्रीमंडळातही चंद्रकांत पाटलांना दुसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे. आता प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती देऊन चंद्रकांत पाटलांना संघटनामध्ये उतरवण्यासाठी अमित शाहांनी रणनीती आखल्याचं बोललं जातंय.

रावसाहेब दानवे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं आहे. रावसाहेब दानवे यांचा 2014 मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा दिल्याने त्यावेळी मंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता पुन्हा दानवेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

याअगोदरही प्रदेशाध्यक्षपदासाठी विविध नावांची चर्चा होती. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही नावं चर्चेत होती. पण अमित शाह आणि मुख्यमंत्री हे दोघेही आपापल्या विश्वासातील नेत्यांच्या नावासाठी प्रयत्न करत असल्याचं सध्या दिसून येतंय. भाजपच्या कोअर कमिटीची नुकतीच दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.

संबंधित बातम्या :

सत्कार समारंभ भाजपच्या खासदाराचा, उपस्थिती राष्ट्रवादीच्या नेत्याची

विधानसभेसाठी भाजपची खलबतं, महाराष्ट्रातील निम्मे मंत्रिमंडळ दिल्लीत

अमित शाहांनी भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलावलं!

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी? पंकजा मुंडे म्हणतात…

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी रणजित पाटलांचं नाव आघाडीवर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI