AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी, नंतर निर्णय घेतील; चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली

लॉकडाऊन आणि राज्यातील जनतेला द्यावयाच्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over lockdown in maharashtra)

मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी, नंतर निर्णय घेतील; चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली
Chandrakant Patil
| Updated on: Apr 13, 2021 | 6:41 PM
Share

कोल्हापूर: लॉकडाऊन आणि राज्यातील जनतेला द्यावयाच्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची कोरोनाशी चर्चा बाकी असेल. त्यानंतर ते निर्णय घेतील, अशा शब्दात चंद्रकातंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over lockdown in maharashtra)

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, मला कुणी तरी एक मेसेज पाठवला. सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. आता फक्त कोरोना अशी चर्चा बाकी आहे. त्यानंतर निर्णय घोषित केला जाईल, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं, असा टोला पाटील यांनी लगावला.

तर लॉकडाऊन अमान्य

डोळे विस्फारतील असं पॅकेज देऊ असं एक वर्षापूर्वी कामगार मंत्री हसम मुश्रीफ म्हणाले होते. मात्र यातील फुटकी कवडीही कामगारांना दिली नाही, असा चिमटा त्यांनी मुश्रीफांना काढला. हा विषाणू लवकर संपणार नाही. काळजी घेऊन लोकांचं जनजीवन सुरळीत ठेवलं पाहिजे. प्रादुर्भाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. असंघटीत कामगारांना वर्षभरात काहीच पॅकेज देण्यात आलं नाही. त्यामुळे आता महिनाभर लॉकडाऊन करणार असाल तर कामगारांना रेशन, किराणा आणि भाजी मोफत देण्याची घोषणा करा. याची व्यवस्था न करता लॉकडाऊन करत असाल तर तो आम्हाला मान्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मुश्रीफांना टोला

यावेळी त्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या बदलीवरून मुश्रीफ यांना टोला लगावला. शुक्ला यांच्या बदलीवर संशय व्यक्त करण्या इतका मी तज्ज्ञ नाही. ही रुटीन बदली आहे. तर तीन महिन्यांपूर्वीच व्हायला हवी होती. आपल्याकडे खूप हुशार लोकं आहेत. बदली काय असते हे त्यांना सांगावं का?, असा टोलाही त्यांनी लगावला. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over lockdown in maharashtra)

संबंधित बातम्या:

Maharashtra lockdown guidelines : महाराष्ट्रात लॉकडाऊन केल्यास नियम काय असू शकतात?

मी कच्च्या गुरुचा चेला नाही आणि धनंजय मुंडेंनी मध्येच भाषण थांबवले!

Maharashtra Lockdown Update: उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनविषयी मुख्यमंत्री काय बोलणार?

(chandrakant patil slams cm uddhav thackeray over lockdown in maharashtra)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.