चंद्रकांत पाटील म्हणतात कोल्हापुरात धर्मसंकट, दादांची महाडिकांना सहानुभूती?

कोल्हापूर: महाभारतात अर्जुनासमोर धर्मसंकट उभा होतं. त्यावेळी कृष्णानं अर्जुनाला धर्मासाठी लढ असं सांगितलं. कोल्हापूर भाजपमध्येदेखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर धर्मसंकट उभा राहिलं आहे. मात्र त्याचवेळी दु:ख होत असलं तरी युती धर्मासाठी मंडलिकांच्या पाठिशी उभा राहणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरात युतीकडून शिवसेनेचे संजय मंडलिक लोकसभेच्या मैदानात आहेत. तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय […]

चंद्रकांत पाटील म्हणतात कोल्हापुरात धर्मसंकट, दादांची महाडिकांना सहानुभूती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

कोल्हापूर: महाभारतात अर्जुनासमोर धर्मसंकट उभा होतं. त्यावेळी कृष्णानं अर्जुनाला धर्मासाठी लढ असं सांगितलं. कोल्हापूर भाजपमध्येदेखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर धर्मसंकट उभा राहिलं आहे. मात्र त्याचवेळी दु:ख होत असलं तरी युती धर्मासाठी मंडलिकांच्या पाठिशी उभा राहणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापुरात युतीकडून शिवसेनेचे संजय मंडलिक लोकसभेच्या मैदानात आहेत. तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक रिंगणात आहेत. मात्र कोल्हापूर मतदारसंघात नात्यांचा गुंता वाढला आहे. कारण राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू आमदार अमल महाडिक आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक भाजपात आहेत. त्यामुळं बंधूनिष्ठा आणि पक्षनिष्ठा या चक्रव्ह्यूहात अमल महाडिक आणि शौमिका महाडिक अडकल्या आहेत. युतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा की मोठ्या बंधूचा आणि दिराचा प्रचार करायचा अशा प्रश्न या दाम्पत्यसमोर आहे. चंद्रकात पाटील यांचे धनंजय महाडिक हे जवळचे मित्र आहेत. त्यामुळं त्यांनीही आपण तिघेही धर्मसंकटात आहोत. मात्र पक्षनिष्ठेमुळं युतीच्याच उमेदवाराच्या पाठिशी उभा राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बंटी-मुन्ना वाद मिटवण्यात वेळ घालवणार नाही: हसन मुश्रीफ

आम्ही धर्मसंकटात असलो तरी मोदींना मत देणाऱ्या उमेदवाराला निवडून आणणार असल्याचं चंद्रकात पाटील म्हणाले. आज त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांची बैठक घेऊन दिशा स्पष्ट केली.

खासदार धनंजय महाडिक यांची भाजपसोबत असलेली सलगी जाहीर आहे. त्यांनीही कधी ते अमान्य केलं नाही. मात्र युतीकडून लढण्याची ऑफर असतानादेखील धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं बंधू भाजप आमदार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांच्यासमोर धर्मसंकट उभा आहे. मात्र त्यातून मार्ग काढून युतीच्याच उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं भाजपनं आज स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटलांना सातत्याने धनंजय महाडिकांबद्दल प्रेम का?

चंद्रकांत पाटील सातत्याने या ना त्या कारणाने धनंजय महाडिक यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही, त्यांनी जितक्या वेळा धनंजय महाडिकांचा उल्लेख केला, त्याचा अर्धाही उल्लेख शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा केला नाही.

धनंजय महाडिक यांच्या कृषीप्रदर्शनाच्या कार्यक्रमातही चंद्रकांत पाटलांनी त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं.

संबंधित बातम्या

शिवसेनेसाठी प्रयत्न करु, पण धनंजय महाडिकांवर आमचं प्रेम: चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी 

शिरुरमध्ये निष्ठावंतांची उपेक्षा, राष्ट्रवादीकडून आयात उमेदवाराला संधी  

अमोल कोल्हेंच्या एंट्रीने शिरुरमध्ये राष्ट्रवादीत दोन गट, प्रचारही थंडावला 

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.