AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज-उद्धव ठाकरेंचं खरंच मनोमिलन? खास व्यक्तीकडून होतोय प्रयत्न, ठाकरेंच्या मामांनीच दिली मोठी माहिती!

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दोन्ही भावांनी एकत्र यावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

राज-उद्धव ठाकरेंचं खरंच मनोमिलन? खास व्यक्तीकडून होतोय प्रयत्न, ठाकरेंच्या मामांनीच दिली मोठी माहिती!
CHANDRAKANT VAIDYA AND RAJ THACKERAY AND UDDHAV THACKERAY
| Updated on: Jun 08, 2025 | 9:15 PM
Share

Chandrakant Vaidya : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना- ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भावांमध्ये समेट घडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता ठाकरे बंधूंचे मामा असलेले चंद्रकांत वैद्य यांनी मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी दोन्ही भावांची युती शक्य वाटत असल्याचं म्हटलंय.

चंद्रकांत वैद्य नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत वैद्य हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा आहेत. त्यांनी टीव्ही 9 मराठीला बोलताना या दोन्ही भावांच्या युतीवर भाष्य केलंय. तसेच यावेळी खासदार संजय राऊत हे दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून दोघांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले होते. यावेळेस वातावरण चांगलं आहे. दोघेही सकारात्मक आहेत असं वाटतंय. खासकरून यावेळी दोघांच्याही मनोमिलनासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे शक्य वाटतंय, असं मत चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केलंय. तसेच राऊतांच्या मागे स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद आहे, ते अनेक अशक्य गोष्टी शक्य करतात, असे कौतुकही चंद्रकांत वैद्य यांनी केले आहे.

भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं होईल

दोघेही सकारात्मक असल्याने निर्णय लवकर होईल अशी अपेक्षा आहे. आई तुळजाभवानीचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र यावे असे वाटतेय. आमचे अनेक नातेवाईक आमच्या संपर्कात आहेत. पण मी आता याविषयावर त्यांच्याशी बोललेलो नाही. ब्लड इज थिकर दॅन वॉटर, म्हणत भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सगळ्याच नातेवाईकांची जशी इच्छा…

दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक प्रयत्न करत आहेत, असं म्हटलं जात होतं. यावरही चंद्रकांत वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मला कल्पना नाहीच. सगळ्याच नातेवाईकांची जशी इच्छा असते तशी माझीही त्यांनी एकत्र यावे अशी इच्छा आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, याबाबत मला कल्पना नाही, असं चंद्रकांत वैद्य यांनी सांगितलंय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?