मंत्र्यांनो 9.30 च्या आधी ऑफिसला पोहोचा : नरेंद्र मोदी

ऑफिसचे काम हे ऑफिसमध्येच संपवा, WORK FROM HOME म्हणजेच घरात बसून काम ही संस्कृती चालणार नाही, असेही पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना खडसावले

मंत्र्यांनो 9.30 च्या आधी ऑफिसला पोहोचा : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांनी सकाळी 9.30 वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. त्याशिवाय अधिवेशन सुरु असताना, कोणत्याही मंत्र्यांला बाहेर दौरा करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशीही सुचना पंतप्रधान मोदींनी दिली आहे. काल (12 जून) झालेल्या  बैठकीत मोदींनी नवनियुक्त मंत्रिमंडळाला हे आदेश दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये प्रचंड विजय मिळवला. त्यानंतर 30 मे रोजी मोदींनी आपल्या मंत्रिमंडळासोबत शपथ घेतली. यानंतर बुधवारी (12 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवनियुक्त मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोदींनी सर्व मंत्र्यांनी कार्यालयात वेळेत या असे आदेश दिले आहेत.

अनेकदा मंत्रिमंडळातील अनेक मंत्री घाईघाईत प्रस्ताव न वाचता त्या फाईलवर सही करतात आणि मंजूरी देतात. मात्र तुम्ही वेळेत ऑफिसला आलात, तर तुम्हाला व्यवस्थित काम करता येईल. तुमची घाई होणार नाही. तसंच ऑफिसचे काम हे ऑफिसमध्येच संपवा, WORK FROM HOME म्हणजेच घरात बसून काम ही संस्कृती चालणार नाही, असेही पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना खडसावले.

तसेच मंत्र्यांनी लोकसभेत नव्या जुन्या मंत्र्यांनी एकमेकांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा असाही सल्ला मोदींनी दिला. तसेच “प्रत्येक मंत्र्यांनी येत्या पाच वर्षाचा कामाचा आराखडा तयार करा, तुमच्या कामाच्या आराखड्यानुसार कामाचे नियोजन करा  आणि कामाला सुरुवात करा”, असेही मोदींनी मंत्रिमंडळातील नेत्यांना सांगितले आहे. ‘येत्या 100 दिवसात तुमच्या कामाचा प्रत्यय दिसायला हवा’ असेही मोदींनी मंत्र्यांना सांगितले आहे.

बुधवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिहेरी तलाक विधेयक आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी वेळेत ऑफिसला या असे आदेश दिले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *