VIDEO : फडणवीस ‘पुन्हा’ म्हणाले, ‘मी पुन्हा येईन’!

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा 'मी पुन्हा येईन' असे एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट (Devendra fadnavis said again will come back) केला.

VIDEO : फडणवीस 'पुन्हा' म्हणाले, 'मी पुन्हा येईन'!
Follow us
| Updated on: Dec 23, 2019 | 10:19 PM

पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन अशा घोषणा केल्या (Devendra fadnavis said again will come back) होत्या. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. यानंतर नेटकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर मी पुन्हा येईन यावरुन फडणवीसांना ट्रोल केलं. यासोबत अनेक नेत्यांनीही त्यांना टोले लगावले. मात्र यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘मी पुन्हा येईन’ असे एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट (Devendra fadnavis said again will come back) केला.

पुण्यात अटलशक्ती पुरस्कार वितरण 2019 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या सोहळ्याला महापौर, उपमहापौर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करण्यास सुरुवात केली.

तेव्हा उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी ‘परत येणार’, ‘मी पुन्हा येणार’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर फडणवीसांनी आधार सोशल फाऊंडेशन उपक्रमाच्या सर्वांचे आभार मानले. त्यावेळी “आयोजक दिलीप काळोखे यांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला आहे आणि या कार्यक्रमात पुढच्या वर्षी मी पुन्हा येणार, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो असे फडणवीस म्हणाले.” त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या (Devendra fadnavis said again will come back) वाजवल्या.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशाला जगात सन्मान मिळतो. मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे घडते त्याची मुहर्तमेढ अटल जी यांनी रोवली, त्या काळात आणू चाचणीला जगात विरोध होता. माञ अटलजी यांनी चाचणी घेतली. जगाने निर्बंध लादले. मात्र ते कोणाकडे गेले नाही नंतर सर्वांनी निर्बंध हटवली, ही त्यांची शक्ती होती,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमादरम्यान अटल साधना पुरस्कार इतर पाच जणांना देण्यात आला. देवीचा पलंग बनवणारे शंतनु ठाकूर, फुल विक्रिते गंगाराम सरपाले, संगीत शिक्षक संजय करंदीकर, डॉ. संतोष भन्साळी आणि मंदार रांजेकर यांना प्रदान करण्यात (Devendra fadnavis said again will come back) आला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.