AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएमची जात दाखवत सीएमची दावेदारी, सचिन पायलट यांच्या 7 अटी

जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेससमोर मुख्यमंत्रीपदाचा पेच आहे. अशोक गहलोत की सचिन पायलट असा प्रश्न पक्षाध्यक्ष राहुल गांधींसमोर आहे. ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या नावावर काल जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र युवा नेते सचिन पायलट समर्थकांनी राडा केल्याने त्यांच्या नावाची घोषणा थांबवण्यात आली. एकीकडे मध्य प्रदेशचा तिढा सोडवत कमलनाथ यांच्या नावाची […]

पीएमची जात दाखवत सीएमची दावेदारी, सचिन पायलट यांच्या 7 अटी
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM
Share

जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेससमोर मुख्यमंत्रीपदाचा पेच आहे. अशोक गहलोत की सचिन पायलट असा प्रश्न पक्षाध्यक्ष राहुल गांधींसमोर आहे. ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या नावावर काल जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र युवा नेते सचिन पायलट समर्थकांनी राडा केल्याने त्यांच्या नावाची घोषणा थांबवण्यात आली. एकीकडे मध्य प्रदेशचा तिढा सोडवत कमलनाथ यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा करण्यात आली असताना, कालच राजस्थानचा मुख्यमंत्रीही ठरेल अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना होती. मात्र अद्याप ही घोषणा झालीच नाही.

राहुल गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. अशोक गहलोत यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. पण  काल सचिन पायलट समर्थकांनी राहुल गांधींच्या निवासस्थानासमोर पायलट यांच्या नावाच्या घोषणा दिल्या आणि राडेबाजीला सुरुवात झाली. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गहलोत यांच्या नावाची घोषणा टाळली.

वाचा: लंडनमध्ये मुस्लीम मुलीवर प्रेम, सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी

सूत्रांच्या मते सचिन पायलट यांनी राहुल गांधींसमोर 7 महत्त्वाचे मुद्दे ठेवले आहेत. त्यानंतर राजस्थानकडे रवाना होत असलेल्या अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना दिल्लीतच थांबवण्यात आलं.

सचिन पायलट यांनी राहुल गांधींसमोर ठेवलेल्या 7 अटी

1) मी जाती-पातीचं राजकारण करत नाही, पण तरीही मी गुर्जर असल्याचा दाखला वारंवार का दिला जातो? 4.5 टक्के गुर्जर असल्याचं म्हटलं जातं, मात्र मी सर्वांना सोबत घेऊन जातो.

2) जाती महत्त्वाच्या नाहीत, अन्यथा तेली समाजातून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत कसं मिळालं असतं?

3) मध्य प्रदेशात जातीच महत्त्वाच्या ठरतात असं विश्लेषकांचं म्हणणं आहे, मात्र तिथे कमलनाथ यांची निवड झाली, तिथे जातीला महत्त्व दिलं नाही.

 4) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निकाल द्यायचा म्हणता, मात्र अशोक गहलोत 1998 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर 2003 मध्ये पक्षाला विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर 2008 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर 2013 आणि 2014 मध्ये पक्षाची सपशेल हाराकिरी झाली.

5) जर अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर 2013 मध्ये पराभवानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष बनून राज्यात कार्यरत होणं अपेक्षित होतं. मात्र ते दिल्लीच्या राजकारणात व्यस्त राहिले आणि राजस्थानवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करु लागले.

6) पक्षात कोणाला बनवायचं असेल तर तसा फॉरम्युला बनवला जातो, जर कोणाला बनवायचं नसेल तर त्या पद्धतीचा फॉरम्युला असतो. साडेचार वर्षांच्या मेहनतीने मुला बनायचं असेल तर त्याचा फॉरम्युला तयार केला जाईल.

7) अशोक गहलोत यांनी मोठं बहुमत रोखण्यासाठी अनेक बंडखोरांना साथ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्याच उमेदवारांना फटका बसला.

या सर्व अटीशर्थींमुळे सचिन पायलट यांनी राहुल गांधींना बुचकळ्यात टाकलं आहे. त्यामुळे राहुल गांधी आज दुपारी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजस्थानचा निकाल

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 199 पैकी 99 जागा काँग्रेसने तर 73 जागा भाजपने जिंकल्या. अन्य पक्ष आणि अपक्षांना मिळून 27 जागा मिळाल्या. शिवाय सपा-बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने बहुमताचा आकडा आता पूर्ण केला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल (199) :

  • काँग्रेस –  99
  • भाजप – 73
  • इतर – 27

कोण आहेत अशोक गहलोत?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी आतापर्यंत दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे. शिवाय कार्यकर्ते आणि जनतेमध्ये गहलोत यांची छाप आहे. अत्यंत कमी वयात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गहलोत यांच्याकडे कुशल संघटक म्हणून पाहिलं जातं.

अशोक गहलोत यांची दुसरी बाजूही आहे. कारण, राजस्थानच्या जनतेने नवा बदल म्हणून काँग्रेसला निवडून दिलंय. पण अशोक गहलोत हे नव्या बदलाचं प्रतिक ठरु शकत नाहीत असं बोललं जातं. कारण ते कित्येक दशकांपासून राजस्थानच्या राजकारणात सक्रिय आहेत. गटबाजीचा आरोपही गहलोत यांच्यावर होत असतो. शिवाय सचिन पायलट यांना काम करताना रोखल्याचा आरोपही काँग्रेसच्याच एका गटाकडून केला जातो.

कोण आहेत सचिन पायलट?

सचिन पायलट हे राजस्थानमधील काँग्रेसचे युवा नेते आहेत. खासदार असलेल्या सचिन पायलट यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली. त्यांच्याकडे गेल्या साडे चार वर्षांपासून काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आहे. दोन लोकसभा आणि विधानसभेच्या चार पोटनिवडणुका जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांच्याकडे नव्या ऊर्जेचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या पाच वर्षात त्यांनी काँग्रेसची संख्या 21 वरुन 100 वर नेली आहे. असं असलं तरी सचिन पायलट हे उद्धट असल्याचा आरोपही केला जातो. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि जनतेच्या पाठिंब्याची उणीव आहे.

संबंधित बातम्या 

राजस्थानमध्ये अशोक गहलोतच मुख्यमंत्री!  

सत्तेनंतर खुर्चीसाठी वाद, राजस्थानात काँग्रेसमधले दोन गट भिडले    

राजस्थानमध्ये 28 वर्षांपासूनची परंपरा यावेळीही कायम

निकालाआधीच विकिपीडिया अपडेट, राजस्थानचा मुख्यमंत्रीही ठरवला!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.