नारायण राणेंच्या होमपीचवरुनच मुख्यमंत्र्यांचे राणेंवर 8 प्रहार, वाचा सविस्तर

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे तब्बल 16 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वैर संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या कार्यक्रमाकडे लक्ष होतं.

नारायण राणेंच्या होमपीचवरुनच मुख्यमंत्र्यांचे राणेंवर 8 प्रहार, वाचा सविस्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे


सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे तब्बल 16 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वैर संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या कार्यक्रमाकडे लक्ष होतं. या कार्यक्रमात राणे आणि ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. अखेर या कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी शिवेसेनेवर नाव न घेता निशाणा साधला. त्यानंतर भाषणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एकाच मंचावर असताना नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं. आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचं कधी नाव घेत तर कधी नाव न घेत टोला लगावला. विशेष म्हणजे राणेंच्या कोकणातील होमपीचवर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्र्यांचे नारायण राणे यांच्यावरील आठ प्रहार :

1) आजच्या हा क्षण आदळाआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचं आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं अभिनंदन करतो. कारण इतक्या लांब राहूनही तुम्ही मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा एक संस्कार असतो. मातीच्या विना काही वेळेला मातीला जाणे. त्यात काही बाभळीचे आणि आंब्याची असतात. बाभळीचे झाडे उगवले तर माती म्हणणार मी काय करु?

2) एवढे वर्ष विमानतळाला का लागले? आम्ही कोकणचं कॅलिफोर्निओ करु, असे काहीजण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, कॅलिफोर्निओला अभिनमान वाटेल असं कोकण उभं करु. बाकीची गोष्ट आदित्यने सांगितले आहेत. पांठतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेल.

3) ज्योतिरादित्य आपण एकत्र येऊन विकास करुयात. जे काही आधीचे विकासाच्या बाबतीत बोलून गेले आहेत त्याबाबत मी परत बोलणार नाही. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणीतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला.

4) कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. हेही खरंय की या व्यासपीठावर महाराष्ट्राचे सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. त्यामुळे सगळ्यांचं विकासासाठी अलायन्स आहे. एखादी चांगली गोष्टी असेल तर नजर लागू नये एक काळा किट्टा लावा लागतो. ते लावणारे काही लोकं आहेत. नारायण राणे आपण म्हणालात ते खरं आहे. आपण काही चांगल्या गोष्टी केल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत, संयमी आहे म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन काहितरी करेल असं नाही. ती मर्द आहे. म्हणूनच गेले अनेक वर्ष तिने हक्काचा लोकप्रतिनिधी आहे. म्हणून विनायक राऊत इथे निवडून आलेले खासदार म्हणून उभे आहेत. मला त्यांचा अभिमान आहे.

5) हेही खरं आहे की, बाळासाहेबांना खोटं बोलणं अजिबात आवडायचं नाही. त्यांना खोटं बोललेलं एक क्षणही आवडायचं नाही. अशी खोटं बोलणारी जी लोकं होती त्यांना बाळासाहेबांनी शिवेसेनेतून काढून टाकलं होतं, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोल. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. मला त्या इतिहासात जायचं नाही.

6) आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. मी कुठेही पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला तेव्हा दुसऱ्याच क्षणी मी सही केली. विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू इच्छित नाही. पण पेड्यातला गोडेपणा अंगी बाळगावा लागतात. म्हणून तिळगूळ घ्या गोड बोला असं म्हणतात. मला बोलायचं नाही. मला बोलावं लागलं. आजचा कार्यक्रम कोकणसाठी महत्त्वाचा आहे. सगळे मिळून काम करु

7) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विकासासाठी पुढे आले आहेत. सगळे मिळून काम करु. आजपर्यंत जे खड्डे मग ते कारभाराचे किंवा रस्त्यावरचे पडले किंवा पाडले गेले असतील ते बुजवण्याचं काम एकत्र मिळून करणार नसू तर आपल्याला निवडून दिलेल्या जनेतचं दुर्भाग्य असेल. खड्ड्यात गेलेली लोकशाही, असं बोलण्याची वेळ निदान त्यांच्यावर येऊ द्यायची नसेल तर विकासाच्या कामात राजकीय जोडे आणू नये.

8) हे माझं महाराष्ट्राचं राज्य आहे, जसं ज्योतिरादित्य शिंदे बोलले ती परंपरा आपण घेऊन पुढे जातो आहोत. ती घेऊन जात असताना तलवार चालवायची वेळ आलीच तर ती तलवार आपल्या देशाच्या-राज्याच्या शत्रूवर चालली पाहिजे. आपपासात जर चालली तर तसं दुर्भाग्य या मातीचं दुसरं कोणतं नसेल. मी आपल्याला विधानभवनात बोललो होतो. संधी मिळणं हे मोठं काम असतं. संधी मिळायला कष्ट तर लागतं याशिवाय नशिबही लागतं. या संधीची माती न करता सोनं करण्याचा प्रयत्न केला तरच या सगळ्याचा उपयोग होईल.

नारायण राणेंचा विनायक राऊतांवर गंभीर आरोप

नारायण राणे यांनी आपल्या भाषणात शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राऊत यांनी चिपी विमानतळासह जिल्ह्यातील अनेक विकासकामात अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला. तसंच राऊत यांनी सुभाष देसाई यांचा उल्लेख चिपी विमानतळाचे मालक असा केला. त्यावर बोलताना राणेंनी ‘मला आज कळलं विमानतळाचे मालक कोण? म्हसकर गेले आणि दुसरे आले. विनायक राऊतांनी स्टेजवरुन सांगितलं. विमानतळ काय देसाई कंपनीचं आहे काय? बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. खोटं बोलणाऱ्यांना साहेबांकडे थारा नव्हता. तुम्हाला मिळणारी माहिती खरी नाही’, असं राणे म्हणाले.

हेही वाचा : लघु, सुक्ष्म का असेना पण नारायणराव आपण केंद्रीय मंत्री आहात, उद्धव ठाकरेंचा चिमटा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI