राहुल गांधी यांची प्रचारात एन्ट्री म्हणजे भाजपचा विजय निश्चित : योगी आदित्यनाथ

"राहुल गांधी यांची प्रचारात एंट्री म्हणजेच भाजपचा विजय निश्चित" असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी नाशिकमधील (CM Yogi Adityanath criticized congress) सभेत केलं.

राहुल गांधी यांची प्रचारात एन्ट्री म्हणजे भाजपचा विजय निश्चित : योगी आदित्यनाथ

नाशिक : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेते राज्यात विविध ठिकाणी प्रचार (CM Yogi Adityanath criticized congress) करत आहे. नुकतंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी तीन सभा (CM Yogi Adityanath criticized congress) घेतल्या. मात्र त्यांच्या या सभांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली. “राहुल गांधी यांची प्रचारात एन्ट्री म्हणजेच भाजपचा विजय निश्चित” असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी नाशिकमधील (CM Yogi Adityanath criticized congress) सभेत केलं.

“येत्या निवडणुकीत पुन्हा महायुती सत्तेवर येणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. गेल्या 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने देश लुटला. इतकंच नव्हे तर त्यांनी भ्रष्टाचाराचे नवीन रेकॉर्ड तयार केले,” अशीही टीका योगी आदित्यनाथ काँग्रेसवर केली.

“काँग्रेससाठी देश, राष्ट्र महत्त्वाचं नाही. त्यांच्यासाठी परिवार वाद महत्त्वाचा असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. काँग्रेसच्या कोणत्याही मंचावरुन वंदे मातरमच्या घोषणा कधीच ऐकून येत नाही. गेल्या 4 महिन्यांपासून काँग्रेसला नेताही राहिलेला नाही आणि नीतीही राहिलेली नाही.” असेही ते म्हणाले.

ठपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव आणि घरगुती गॅस उपलब्ध करुन देण्याचं काम केलं. तसेच तीन तलाकचा निर्णय घेऊन महिला सशक्तीकरणही मोदींनी केलं. यापूर्वी पाकिस्तान बॉम्बच्या धमकी देत होता. मात्र आता पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे. गेल्या 136 कोटी जनतेच्या कल्याणासाठी मोदींनीही काम केली,” असे कोडकौतुकही योगी आदित्यनाथ यांनी (CM Yogi Adityanath criticized congress) केलं.

“भारताच्या प्रगतीत महाराष्ट्राचे मोठं योगदान आहे. प्रभू श्री रामाने वनवासातील सर्वात मोठा कालखंड नाशिकमध्ये घालवला. याच नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी विकास केला आहे. यापुढेही त्या विकास करतील. त्यामुळे त्यांना विजयी करा” असे आवाहनही त्यांनी नाशिकमधील सभेदरम्यान केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *