राधाकृष्ण विखेविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला?

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे (Shirdi Assembly Constituency) माजी आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना मोठं आव्हान उभं राहणार असल्याचं चित्र आहे.

राधाकृष्ण विखेविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला?
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 7:06 PM

अहमदनगर : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे (Shirdi Assembly Constituency) माजी आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना मोठं आव्हान उभं राहणार असल्याचं चित्र आहे. काँग्रेस विखे पाटलांविरोधात (Congress BJP War) विधानपरिषदेचे आमदार सुधीर तांबे (MLA Sudhir Tambe) यांना उतरवण्याची शक्यता आहे. सुधीर तांबे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे मेहुणे आहेत. सुधीर तांबेनी विखे पाटलांविरोधात निवडणूक मैदानात उतरावे यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आग्रही असल्याची माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी दिली आहे.

अहमदनगर हा राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रीय जिल्हा आहे. अनेक मातब्बर नेते आणि माजी मंत्री असलेल्या या जिल्ह्यात काँग्रेस भाजपमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः संगमनेर आणि शिर्डीमधील राजकारणात रस्सीखेच टोकाला गेली आहे. संगमनेरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व आहे. तर शेजारच्याच शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखेंचं वर्चस्व आहे.

राधाकृष्ण विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला शह देण्यासाठी थेट संगमनेरच्या राजकारणात सक्रियता दाखवली होती. त्यांनी थोरातांनाच आव्हान दिलं होतं. विखेंचे सुपुत्र खासदार सुजय विखेंनी लोकसभा निवडणुकीत थोरातांच्या होम ग्राऊंड संगमनेरमध्येच जोर लावल्याने थोरात गटात कमालीची अस्वस्थता पाहायला मिळाली होती.

लोकसभेचा अनुभव पाहता काँग्रेसने देखील विखेंना त्यांच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच शिर्डी विधानसभा मतदारसंघात शह देण्याची रणनिती आखली आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखेंचं वर्चस्व आहे. सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या जाळ्यामुळे आतापर्यंत विखेंनी येथे एकहाती सत्ता गाजवली. मात्र, काँग्रेसने थेट बाळासाहेब थोरातांच्या मेहुण्यांनाच शिर्डीत उतरवल्याने आता ही लढत रंगतदार होणार आहे.

शिर्डी विधानसभा मतदार संघ – 

शिर्डी विधानसभा मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. मागील निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील मोदी लाटेतही 70 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा पराभव केला होता. विखे पाटील आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विखे पाटलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शिर्डी मतदारसंघात पूर्णत: खिळखिळी झाल्याने विखेंचं पारड जड असल्याचं मानलं जात होतं. मात्र, आमदार सुधीर तांबेच्या एन्ट्रीनंतर ही लढत तुल्यबळ होईल असं दिसत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले. यावेळी भाजप शिवसेना युती झाली, तर ही जागा शिवसेनेकडे असल्याने विखे पाटील तिकीट मिळवण्यासाठी यातून कसा मार्ग काढतात ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. युती झाली नाही, तर मात्र विखेंसमोर शिवसेनेचंही मोठं आव्हान असेल.

मतदार संघातील महत्वाचे प्रश्न – 

  • श्री साईबाबा संस्थानातील 3 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याची मागणी
  • शिर्डीतील वाढलेली गुन्हेगारी.
  • कोणतेही मोठे उद्योग नसल्याने बेरोजगारीची वाढती समस्या.
  • गोदावरी पाटपाण्यासाठी कॅनॉल रुंदीकरण.
  • पाण्याअभावी उद्ध्वस्त झालेल्या फळबागा.
  • निळवंडे लाभधारकांना हक्काचं पाणी मिळण्यासाठी अपूर्ण कालव्यांची कामे मार्गी लावणे.
  • शिर्डीतील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन प्रकल्प.
  • डाळिंबाचं विक्रमी उत्पादन, मात्र कोणतेही प्रकिया उद्योग नाहीत.
  • शेतमालास शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिर्डी विमानतळ येथे सुविधा उपलब्ध करुन देणे.
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.