कमिशनवर जुन्या नोटा बदलवण्याचा धंदा सुरु, काँग्रेसकडून स्टिंग सादर करत दावा

कमिशनवर जुन्या नोटा बदलवण्याचा धंदा सुरु, काँग्रेसकडून स्टिंग सादर करत दावा


नवी दिल्ली : देशात अजूनही कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलवण्याचा धंदा सुरु आहे. तसेच यात भाजपच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यासाठी काँग्रेसने एक व्हिडिओही सादर केला. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

जवळजवळ 15 टक्के कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलवण्यात येत असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करुन दाखवावी असेही म्हटले. यावेळी सिब्बल यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि कमलनाथ यांच्या सहकाऱ्यांवरील छाप्यांबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, ‘मोदी सरकार संवैधानिक संस्थांचा उपयोग राजकीय विरोधकांविरोधात करत आहे. मात्र, नोटबंदीनंतर भाजप नेत्यांच्या मदतीने सुरु असलेल्या घोटाळ्यावर या संस्था कोणतीही कारवाई करत नाही. आयकर विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि केंद्रीय तपास संस्था सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. सरकार आणि या संस्था एकाच मंचावर आल्यास देशात लोकशाही टीकू शकणार नाही. लोकशाही वाचवण्याचे काम आता जनतेचे आहे.’

‘भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यास नोटा बदलून मिळतात’

सिब्बल यांनी दाखवलेला व्हिडीओमध्ये एक व्हिडीओ 7 जुलै 2018 चा आहे. यात राहुल रत्नेकर नावाचा व्यक्ती भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यास नोटा बदलून मिळत असल्याचे सांगत आहे. या व्हिडीओचा आधार घेत ईडी या लोकांना कधी अटक करणार? विरोधी पक्षांना विरोधकांविरोधात डायरीचा उपयोग होतो, मग बिरला डायरीची दखल कधी घेणार? आणि हा नियम येडियुरप्पांना लागू करणार का? असेही प्रश्न सिब्बल यांनी विचारले.

कोषागार आणि बँकेतील लोक 15 टक्के कमिशन घेऊन नोटा बदलून देत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या मागील एका खुलाशाचा संदर्भ देत गुजरातच्या एका व्यक्तीचा आधार घेतला. ते म्हणाले, ‘एक सामान्य व्यक्ती भाजप मुख्यालयात जाऊन नव्या करकरीत नोटा आणतो. आता तर प्रश्न अशा 26 ठिकाणांचा आहे.’

पाहा व्हिडीओ:

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI