राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर, पुन्हा स्वगृही परतणार?

शिर्डी : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील पक्ष सोडणार असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. कारण, त्यांनी शिर्डीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी जाहीर प्रचारसभा घेतली. राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे ते भाजपात जाणार, की शिवसेनेत जाणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करत त्यांनी शिवसेना उमेदवाराचा प्रचार केला. शिर्डी मतदारसंघात विखे कुटुंबाचं […]

राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर, पुन्हा स्वगृही परतणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

शिर्डी : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील पक्ष सोडणार असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. कारण, त्यांनी शिर्डीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी जाहीर प्रचारसभा घेतली. राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे ते भाजपात जाणार, की शिवसेनेत जाणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करत त्यांनी शिवसेना उमेदवाराचा प्रचार केला.

शिर्डी मतदारसंघात विखे कुटुंबाचं वर्चस्व मानलं जातं. आतापर्यंत विखे पाटलांनी नगर जिल्ह्यात त्यांचे चिरंजीव आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी छुपा प्रचार केल्याचं समोर आलं होतं, पण आता त्यांनी जाहीरपणे प्रचार सुरु केलाय. त्यांनी शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ साकुरी गावात सभा घेतली. यामध्ये विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. तर भाजप सरकारचं कौतुक केलं.

आमच्या सांगण्यावरून नगरच्या सभेत पंतप्रधान मोदींनी स्वतंत्र पाणी मंत्रालयाची घोषणा केली. पवार आणि थोरातांकडून फक्त भावनिक आणि व्यक्तिगत राजकारण केलं जातंय. पार आमच्या भावबंदकीवर गेले, अशी आगपाखड विखे पाटलांनी केली. आपली राजकीय भूमिका 27 तारखेला जाहीर करणार असल्याचं विखे पाटलांनी जाहीर केलं होतं. पण त्याअगोदरच ते युतीच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे काँग्रेस सोडण्याची फक्त औपचारिकता उरली असल्याचं दिसतंय.

शिवसेना आणि विखे कुटुंबाचं नातं

शिवसेना आणि विखे कुटुंबाचं नातं जुनं आहे. 1991 च्या निवडणुकीत दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबतचा वाद थेट कोर्टापर्यंत पोहोचला होता. यानंतर बाळासाहेब विखेंनी काँग्रेस सोडत 1995 ला शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रात मंत्रीपदही भूषवलं. तर राज्यात 1995 ला युतीचं सरकार आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. पण शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे विखे पिता-पुत्रांनी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता.

विखे पाटलांची उद्या पत्रकार परिषद

विखे पाटलांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. पक्षविरोधी काम केल्याबद्दल जाब विचारण्यात आला आहे. पण त्यापूर्वीच विखे पाटील काँग्रेस सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विखे पाटलांनी लोणी प्रवरा इथे उद्या पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत ते पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

व्हिडीओ पाहा :

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.