AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचा नवा प्लॅन, राजीव सातवांच्या पत्नीला राज्यसभा नव्हे तर विधानसभेची उमेदवारी?

pradnya satav | प्रज्ञा सातव यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यास ही संधी कोणत्या काँग्रेस नेत्याकडे जाणार, हेदेखील पाहावे लागेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे या उमेदवारीसाठी उत्सुक आहेत.

काँग्रेसचा नवा प्लॅन, राजीव सातवांच्या पत्नीला राज्यसभा नव्हे तर विधानसभेची उमेदवारी?
संसद
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 8:49 AM
Share

मुंबई: राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या जागी त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवायचे की नाही, याबाबत अद्याप पक्षाचा निर्णय होऊ शकलेला नाही. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. तेव्हापासून काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, त्याऐवजी प्रज्ञा यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह देखील पुढे आला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

तर दुसरीकडे प्रज्ञा सातव यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यास ही संधी कोणत्या काँग्रेस नेत्याकडे जाणार, हेदेखील पाहावे लागेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे या उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.

राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.

राजीव सातव यांच्या निधनानं जागा रिक्त

काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, 16 मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.

काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रज्ञा सातव यांची नियुक्ती

प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून  निवड झाल्यानंतर टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजीव सातव यांची क्षणाक्षणाला आठवण येत असल्याचं सांगितलं. तसंच मिळालेली संधी मोठी आहे. कामाला मोठी स्पेस आहे. या कामात राजीवजींच्या कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ असेल. मी चांगलं काम करुन दाखवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

‘राजीव तुम्हाला मिस करतेय’, काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक

राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर कुणाला संधी?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.