काँग्रेसने दलितांचा फक्त ‘व्होटबँक’ म्हणून वापर केला- मुख्यमंत्री

नागपूर : “काँग्रेसनं देशात 55-60 वर्षे सत्ता भोगली, पण दलितांचा फक्त व्होटबँक म्हणून वापर केला. संविधानाचा बाप असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेसने एक इंचंही जागा दिली नाही. आम्ही सत्तेत आल्यावर तीन दिवसांत इंदू मिलच्या जागेची परवानगी आणली”, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.  नागपुरातील भाजपच्या विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  […]

काँग्रेसने दलितांचा फक्त 'व्होटबँक' म्हणून वापर केला- मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

नागपूर : “काँग्रेसनं देशात 55-60 वर्षे सत्ता भोगली, पण दलितांचा फक्त व्होटबँक म्हणून वापर केला. संविधानाचा बाप असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेसने एक इंचंही जागा दिली नाही. आम्ही सत्तेत आल्यावर तीन दिवसांत इंदू मिलच्या जागेची परवानगी आणली”, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.  नागपुरातील भाजपच्या विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. भाजपच्या या विजयी संकल्प सभेला देशभरातील अनुसूचित जातीचे 25 हजारपेक्षा जास्त लोक आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरींनीही काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.  “काँग्रेसने आणीबाणी आणली, 80 वेळा देशाचं संविधान बदललं, तोच काँग्रेस पक्ष भाजप संविधान बदलणार, असं विष पसरवत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. दलितांचा फक्त मतांसाठी वापर करणारी काँग्रेस महाराष्ट्रात येऊन दलित-दलित करत आहे” असंही गडकरींनी नमूद केलं.

“आजपर्यंत काँग्रेसने अनुसूचित जातीचा फक्त मतांसाठी वापर केला. आम्ही दलितांसाठी विकास कामं केलीत. भाजप संविधान बदलणार, असे विष काँग्रेसकडून पसरवलं जातंय”, असा घणाघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केला.

“शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही आणि अर्धा पगार आम्ही, हिच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची रोजगार हमी” अशा शब्दात गडकरींना काँग्रेसवर टीका केली.

दरम्यान राजनाथ सिंह म्हणाले,  “दलितांसाठी काम करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाएवढी देशात मोठी संघटना नाही. संघ आणि भाजपही दलितांसाठी अनेक समाजकल्याणाची कामं करत आहेत”

भाजपच्या या विजयी संकल्प सभेत राज्यातील प्रमुख अनुसूचित जातीतील मंत्री आणि आमदारांची उपस्थिती होती. आगामी निवडणुकीत दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेऊन भाजपनं विजयाचा संकल्प केला. पण तो पूर्ण होणार का हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ठेरलं.

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.