आरोग्याची काळजी घ्या, तणावमुक्त आणि फिट रहा; अजितदादांचा पोलिसांना आपुलकीचा सल्ला

पोलिसांच्या आरोग्याची काळजी वरिष्ठांनी घेतली पाहिजे. पुण्यात काही अधिकारी तणावात राहत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येतात. त्यामुळे असे प्रकार घडले नाही पाहिजेत. एकीनं काम करून विषय मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना आणि आपुलकीचा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.

आरोग्याची काळजी घ्या, तणावमुक्त आणि फिट रहा; अजितदादांचा पोलिसांना आपुलकीचा सल्ला
उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार जसे आपल्या कार्यशैलीमुळे ओळखले जातात. तसेच ते आपलं सडेतोड वक्तृत्व आणि समजावणीमुळेही ओळखले जातात. त्याचा प्रत्यय आत पुन्हा एकदा आला. पोलिस खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागते. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची काळजी वरिष्ठांनी घेतली पाहिजे. पुण्यात काही अधिकारी तणावात राहत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येतात. त्यामुळे असे प्रकार घडले नाही पाहिजेत. एकीनं काम करून विषय मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना आणि आपुलकीचा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. (Ajit Pawar advises police to take care of health and stay stress free )

पुणे आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ‘सीएमआयएस’ या वेबसाईट आणि अॅपचं उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पिंपरीचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुण्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पोलिसांनी तणावमुक्त राहून काम करण्याचा सल्ला दिला. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये कसलीही तडजोड करु नका, अशी सूचनाही अजित पवारांनी यावेळी दिली.

महिला पोलिसांना आता 8 तास काम

हाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक संजय पाडे यांनी पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिलीय. महाराष्ट्र सरकारनं महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 तासांवरुन 8 तासांवर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संजय पांडे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलं आहे . चार तासांची ड्युटी कपात केल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील निर्णयाचं स्वागत केलं आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडून निर्णयाचं स्वागत

महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

यशोमती ठाकूर यांच्याकडूनही स्वागत

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. पोलीस महासंचालक पांडे आणि पोलीस दल, गृह विभानं महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतेय, असं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या :

शाळा, मंदिरांनंतर आता राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुद्धा सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय

परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच, झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो : राजेश टोपे

Ajit Pawar advises police to take care of health and stay stress free

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI