Tanmay Fadnavis | तन्मय दूरचा नातेवाईक, कोरोना लशीवरील सवालानंतर फडणवीसांनी हात झटकले

तन्मय फडणवीस हे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू, तर देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू अभिजीत फडणवीस यांचे सुपुत्र आहेत (Devendra Fadnavis clarification Tanmay Fadnavis )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:04 PM, 20 Apr 2021
Tanmay Fadnavis | तन्मय दूरचा नातेवाईक, कोरोना लशीवरील सवालानंतर फडणवीसांनी हात झटकले
देवेंद्र फडणवीस आणि तन्मय फडणवीस

नागपूर : तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) आपला दूरचा नातेवाईक आहे, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हात झटकले आहेत. नियम तोडून लस कशी घेतली, हे आपल्याला माहित नसल्याच स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं. तन्मय अभिजीत फडणवीसच्या बाबतीत मी लेखी निवेदन दिलं आहे. त्यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis clarification on Tanmay Fadnavis getting Corona Vaccine)

देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचं वादळ उठलं आहे. येत्या एक मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु त्याआधीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली, हा प्रश्न विचारला जात आहे. फडणवीसांनी हात वर केल्यानंतरही, लांबचा नातेवाईक असेल, तर दोघांचे इतके एकत्र फोटो कसे? चुलत भावाचा मुलगा दूरचा नातेवाईक होतो का? असे अनेक सवाल नेटिझन्सनी विचारले आहेत.

कोरोना लस घेतानाचा फोटो

तन्मय फडणवीस हे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू, तर देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू अभिजीत फडणवीस यांचे सुपुत्र आहेत. तन्मय लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.

कोण आहेत तन्मय फडणवीस?

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे

माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू

अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख

नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन

(Devendra Fadnavis clarification on Tanmay Fadnavis getting Corona Vaccine)

काँग्रेसचा हल्लाबोल

“45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय कीडे मुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का!” असा सवाल काँग्रेसच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आला आहे.

“तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? भाजपकडे रेमडेसिव्हीरप्रमाणे लसींचाही गुप्त साठा आहे का?” असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. आता जनतेच्या प्रश्नावर फडणवीस मौन सोडणार का, हा सवाल विचारला जात आहे.

संबंधित बातम्या :

फडणवीसांच्या 25 वर्षीय पुतण्याला लस, आव्हाडांचे दोन शब्दात तन्मयला टोले

‘चाचा विधायक है हमारे’ लशीवरुन टीकेची झोड उठलेला फडणवीसांचा पुतण्या तन्मय आहे कोण?

PHOTO | वयाचे निकष पूर्ण करण्याआधीच कोरोना लस? ‘अभिनेता’ पुतण्या फडणवीसांना अडचणीत आणणार?

(Devendra Fadnavis clarification on Tanmay Fadnavis getting Corona Vaccine)