“आमच्यासाठी ‘तो’ विषय संपला, पण अंगावर आल्यानंतर सोडत नाही”

तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

"आमच्यासाठी 'तो' विषय संपला, पण अंगावर आल्यानंतर सोडत नाही"
devendra fadnavis

मुंबई : वेळ आली तर शिवसेना भवन (Shivsena Bhavan) फोडू असं वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. त्यानंतर लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. याच प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही, अशा इशारासुद्धा त्यांनी दिलाय. (devendra fadnavis comment on controversial comment of prasad lad on shivsena bhavan said we do not belongs to the culture of fight)

हा विषय संपला, पण अंगावर आलं तर सोडत नाही

मुंबईमध्ये भाजप कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी बोलताना चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी आपला व्हिडीओ काढून स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही; पण अंगावर आलं तर सोडत नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रसाद लाड काय म्हणाले होते ?

भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत 31 जुलै रोजी उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रसाद लाड यांनी वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं. “दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत. मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही. सेनच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत,” असा इशारा प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिला. तसेच “शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू, तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू,” असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यानंतर वाद पेटल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊत, छगन भुजबळ यांच्या खोचक प्रतिक्रिया

दरम्यान लाड यांच्या या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसाद लाड यांच्यावर अतिशय खोचक पद्धतीने टीका केली. लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यासंबंधी आमचे शाखाप्रमुख बोलतील असा खोचक वार संजय राऊत यांनी केला. तर नाशिकमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी लाड यांच्या वक्तव्यावर मिश्किल भाष्य करत त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असं हसत हसत भुजबळ म्हणाले होते.

इतर बातम्या :

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा फायदा शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत होणार?

वरळी BDD चाळींचा कायापालट होणार, किती फुटांचं घर आणि कधीपर्यंत प्रकल्प पूर्ण?, एका क्लिकवर सर्व माहिती

आजि सोनियाचा दिनु, संकटातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिम्मत दाखवली, पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

(devendra fadnavis comment on controversial comment of prasad lad on shivsena bhavan said we do not belongs to the culture of fight)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI