माथाडी कामगारांना अजून 20 हजार लस देणार, फडणवीसांचं आश्वासन; नरेंद्र पाटलांचं कौतुक

माथाडी कामगारांना विविध संस्थांकडून सीएसआर फंडातून कोरोना लसीचे 20 हजार डोस उपलब्ध करून देण्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. माथाडी कामगारांचे लसीकरण 25 सप्टेंबरपर्यंत सातत्याने सुरु ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

माथाडी कामगारांना अजून 20 हजार लस देणार, फडणवीसांचं आश्वासन; नरेंद्र पाटलांचं कौतुक
नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 6:24 PM

नवी मुंबई : माथाडी कामगारांना विविध संस्थांकडून सीएसआर फंडातून कोरोना लसीचे 20 हजार डोस उपलब्ध करून देण्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. माथाडी कामगारांचे लसीकरण 25 सप्टेंबरपर्यंत सातत्याने सुरु ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. शिवाय माथाडी कामगारांसाठी 24 तास सेवा देणारी ऍम्ब्युलन्स देण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिलंय. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनात आज 1 हजार माथाडी कामगारांना लसीकरणाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. (Devendra Fadnavis inaugurated the vaccination program for Mathadi workers)

‘माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही, लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे कोव्हीड-१९ संबंधीत लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे, यासाठी नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे राबविला जाणारा माथाडी कामगारांचे मोफत लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहिल’, असे उद्गार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

लसीकरण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

बाजार समितीमधून लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी माथाडी कामगार बाजारात येणे आवश्यक आहे. शिवाय बाजारातील गर्दी कमी करणे शक्य नसल्याने अशा गर्दीत माथाडी कामगारांना जीवमुठीत घेऊन काम करावे लागते. भाजीपाला आणि मसाला मार्केटमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली असली तरी शासनाकडून पुरेसा लस पुरवठा होत नसल्याने सातत्याने लस तुटवडा या ठिकाणी होत होता. त्यामुळे अनेक माथाडी कामगार लसीकरणापासून वंचित होते. परिणामी या लसीकरण कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गर्दी पाहायला मिळाली. तर बाजार समिती एमआयडीसी व रेल्वे यार्ड सारख्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेत राबणाऱ्या माथाडी कामगारांसाठी आज सोन्याचा दिवस असल्याची भावना माथाडी कामगारांनी व्यक्त केली आहे.

या प्रसंगी आमदार गणेश नाईक, शशिकांत शिंदे, प्रसादजी लाड, निरंजन डावखरे, आमदार संदिप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवीमुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील, अॅड्. भारतीताई पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, माथाडी हॉस्पीटल ट्रस्टचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, बाजार समिती संचालक संजय पानसरे, मोहन गुरनानी, शंकर पिंगळे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

‘तुमच्या हृदयात प्राची वहिनींनाच ठेवा’

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर देवेंद्र नावाचा टॅटू काढल्यानंतर, आता जवळपास महिनाभराने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही, आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा, आशिर्वादात ठेवा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नरेंद्र पाटील यांनी गेल्या महिन्यात आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या होत्या.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : ‘या’ देशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक

कन्नड, चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठं नुकसान, हर्षवर्धन जाधवांचा आंदोलनाचा इशारा

Devendra Fadnavis inaugurated the vaccination program for Mathadi workers

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.