दिल्लीतल्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही, तुम्ही राष्ट्रवादीत जा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दिल्लीतल्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही, तुम्ही राष्ट्रवादीत जा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

मुंबई : गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं. (Eknath Khadse says Senior BJP leaders in Delhi said you have no chance in the party, you go to the NCP)

यावेळी बोलताना एकनाथ खडसे मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. खडसे म्हणाले की, भाजप सोडण्यापूर्वी मी दिल्लीतल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बातचित केली. परंतु ते मला म्हणाले की, तुम्हाला आता पक्षात संधी नाही. तुम्हा राष्ट्रवादीत जा. त्यानंतर मी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला.

खडसे म्हणाले की, मी आयुष्याची 40 वर्ष भाजपसाठी काम केलं. एकाएकी पक्ष सोडावा असं मला कधीच वाटलं नाही. विधानसभेत माझी खूप छळवणूक झाली, मानहानी झाली, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्वांना मी सभागृहात विचारयाचो की माझा गुन्हा काय? मी कोणता गैरव्यवहार केला असेल तर मला त्याची कागदपत्र दाखवा, परंतु या क्षणापर्यंत मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही.

खडसे म्हणाले की, मी राजकारणात आल्यापासून संघर्ष करतोय. अगदी मला आमच्याच मंत्रिमंडळातही संघर्ष करावा लागला. परंतु मी कधीही द्वेषाची भावना ठेवली नाही. मी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही. वरवर ज्येष्ठ नेते वगैरे म्हणायचं आणि पाठीत खंजीर खुपसायचा असं केलं नाही. असे म्हणत खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भाजप नेत्यांना टोला लगावला.

खडसे म्हणाले की, मी कधीही महिलेला समोर ठेवून राजकारण केलं नाही. मी काही लेचापेचा नाही. मला जयंत पाटील म्हणाले होते की, माझ्यापाठी ईडी लावतील वगैरे. परंतु त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. खडसेंच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हशा झाला.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

संबंधित बातम्या : 

Eknath Khadse Live Update | खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला 11 दिग्गजांची उपस्थिती

एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल; भाजपचा पलटवार

(Eknath Khadse says Senior BJP leaders in Delhi said you have no chance in the party, you go to the NCP)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI