शरद पवारांच्या माढ्यातून माघारीचं पहिलं कारण समोर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या माघारीचं पहिलं कारण समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळमधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या मावळमधून लढण्याच्या हट्टापोटी शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्याची चर्चा आहे. […]

शरद पवारांच्या माढ्यातून माघारीचं पहिलं कारण समोर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या माघारीचं पहिलं कारण समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळमधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या मावळमधून लढण्याच्या हट्टापोटी शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्याची चर्चा आहे. शिवाय, अजित पवारही सुपुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. या सर्वांचा परिपाक म्हणून शरद पवार यांनी एकाच कुटुंबातील तिघेजण लोकसभेच्या रिंगणात नको, हे कारण देत माढ्यातून माघार घेत वादावर पडदा टाकला.

पार्थ पवार यांचा हट्ट आणि पार्थ यांच्यासाठी अजित पवार यांचा आग्रह हे पाहता कुटुंबांअंतर्गत कलह वाढण्याच्या आधीच शरद पवार यांनी माढ्याच्या रिंगणातून माघार घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘या’ दोन निकषांवर पार्थला मावळमधून उमेदवारी : शरद पवार

माढ्यातून पवारांची माघार, पार्थच्या उमेदवारीचीही घोषणा

मी स्वत: लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आणि सोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचीही घोषणा केली. मात्र, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी दोन निकष सांगितले.

कोणत्या दोन निकषांवर पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी?

पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याबाबत शरद पवार म्हणाले, “आमच्या कुटुंबीयांमधील सुप्रिया सुळे उमेदवारी करणार आहेत, तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीसंदर्भात शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवाराला संधी द्यावी, असा विचार आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला पार्थला उमेदवारी देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत.”

तसेच, लोकमान्यता आणि निवडणूक येण्याची क्षमता या निकषांवर आम्ही उमेदवारीचा निर्णय घेतो, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांची उमेदवारी अप्रत्यक्षरित्या जाहीरच करुन टाकली.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.