राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आनंद परांजपेंची ‘संगीत खुर्ची’, माजी खासदार दीड तास स्टेजवर उभे

बसण्यासाठी पहिल्या रांगेत जागाच नसल्याने आनंद परांजपे यांनी स्टेजवरच एका बाजूला उभं राहणं पसंत केलं. (Anand Paranjape NCP program)

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आनंद परांजपेंची 'संगीत खुर्ची', माजी खासदार दीड तास स्टेजवर उभे
आनंद परांजपे यांना स्टेजवर बसायला जागाच नाही


अंबरनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज अंबरनाथ शहरात पार पडला. या मेळाव्यात माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे (Anand Paranjape) यांना बसण्यासाठी खुर्चीच नव्हती. त्यामुळे परांजपे तब्बल दीड तास स्टेजवर उभे होते. (Former MP Anand Paranjape stands near stage in NCP program)

बसण्यासाठी पहिल्या रांगेत जागाच नसल्याने आनंद परांजपे यांनी स्टेजवरच एका बाजूला उभं राहणं पसंत केलं. दरवेळी कुणी पहिल्या रांगेतील व्यक्ती भाषणाला उठली, की परांजपे त्या जागेवर जाऊन बसायचे. हा ‘संगीतखुर्ची’चा खेळ तब्बल दीड तास सुरु होता. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने शेवटपर्यंत परांजपे यांना खुर्ची मिळालीच नाही.

आनंद परांजपे कोण आहेत?

आनंद परांजपे राष्ट्रवादीचे ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर ते कल्याण मतदारसंघातून लोकसभा खासदार राहिले आहेत. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु सलग दोन वेळा त्यांना शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला.

कोणाकोणाची उपस्थिती?

अंबरनाथ शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ हे पहिल्या रांगेत बसले होते. माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आनंद परांजपे काय म्हणतात?

याबाबत परांजपे यांना विचारलं असता, माझ्याकडे नियोजनाची जबाबदारी असल्यानं मी बसलो नाही, असं सांगत वेळ मारुन नेली. मात्र माजी खासदार असलेल्या एखाद्या व्यक्तीला दीड तास उभं ठेवणं अयोग्य असल्याचं मत यानंतर व्यक्त केलं जात होतं. (Former MP Anand Paranjape stands near stage in NCP program)

सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल

‘मन की बात’ मधून एक फोन करा असं मोदी सांगतात परंतु प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मोदीसाहेब ‘मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाी. काहींसाठी मोदींचे अश्रू निघतात परंतु माझ्या आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळाव्यात केला

जितेंद्र आव्हाड यांचा गणेश नाईक यांना टोला, पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

मोदी साहेब ‘मन की बात’मधून चांगलं बोलतात, परंतु कृती काहीच करत नाहीत; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

(Former MP Anand Paranjape stands near stage in NCP program)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI