Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली, बाळासाहेबांचा दाखला देत शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका

शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या ##णावर लाथ घाला असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुध्द पडतील आणि त्यावेळेस त्यांना कांद्याचा वास द्या, ते शुध्दीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असे बाळासाहेब म्हणाले होते, आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे पालन करणार का? असे विधान पडळकरांनी केले आहे.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली, बाळासाहेबांचा दाखला देत शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका
गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Jun 05, 2022 | 8:39 PM

नाशिक : आज नाशिकमध्ये कांदा परिषद (Onion Parishad) भरवण्यात आली आहे. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची जीभ पुन्हा घसरली आहे. या परिषदेत बोलताना पडळकर म्हणाले, याच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंनी शेलक्या शब्दांत टीका केली होती. पवारांना  कांद्याचा वास द्या, ते शुध्दीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असे बाळासाहेब म्हणाले होते, आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे पालन करणार का? असे विधान पडळकरांनी केले आहे. त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकरांची पवारांबाबतची अनेक वक्तव्यं ही वादत राहिली आहेत.

खालच्या भाषेत टीकेची ही पहिलीच वेळ नाही

भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांची असे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गोपीचंद पडळकर यांनी याआधीही अनेकदा शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. तसेच पवारांचं राजकारण हे नेहमीच पडळकरांच्या टार्गेटवर असतं. काही दिवसांपूर्वीच झालेला चौंडीतला वादही राज्यभर गाजला होता. पडळकर फक्त एवढेच बोलून थांबले नाहीत. तर त्यांनी पुन्हा राज्य सरकारवरही जोरदा हल्लाबोल चढवला आहे.

बाळासाहेबांची स्पप्न पूर्ण करा

कांदा शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत बोलताना ते म्हणाले, दोन वर्षे विश्वास घाताने आम्ही रडत बसलो नाही. सत्ताधारी पक्षातील लोक बोलतात यांना कांद्यातलं काय कळतं. मात्र कांदा कोणाचा डोळ्यात कसं पिळावा हे आम्हाला चांगले कळतं. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. हे सरकार कांदा चाळीसाठी अनुदान देत नाही. कांद्याला हमीभाव हा फिक्स केला पाहिजे. चाळीस वर्षांनतर तीच लढाई सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कांदा उत्पादकच्या बाजून होती. त्यांची स्वप्न पूर्ण करा, असेही ते म्हणाले आहेत.

विमा कंपन्यांशी सेटलमेंट केली का?

कांदा उत्पादकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ का येते? उत्पादन खर्च व उत्पादन फरकाची रक्कम अनुदान म्हणून द्यावी. परिस्थिती इतकी भयानाक आहे की शेतकरी पुत्रांना मुलगी द्यायला कोण तयार नाही. राज्यात 20 लाख मेट्रिक टन ऊस अतिरिक्त आहे . हा ऊस तोडणीवाचून पडून आहे. सांगली जिल्ह्यात डाळिंब नष्ट झाले आहे. मात्र सरकार याकडे बघत नाही, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना एक लाख नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र अनुदान नाही. विम्याचीही तीच परिस्थिती आहे, आदी विमा कंपनीवर मोर्चा काढत होते ते आता गप्प आहेत, मग विमा कंपनीशी काही सेंटलमेंट केली आहे का? असा सवाल पडळकरांनी विचालला आहे. तसेच लवकरच हे प्रश्न मिटले नाही तर फिरणे मुश्किल होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें