AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुहागर नगराध्यक्षांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश, विकासासाठी अजित पवारांचा शब्द

गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी उपनगराध्यक्षा स्नेहा बागडे, प्रदीप बेंडल यांनी आपल्या समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

गुहागर नगराध्यक्षांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश, विकासासाठी अजित पवारांचा शब्द
गुहागरच्या नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 5:30 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याची आमची भूमिका आहे, असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलं आहे. गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी उपनगराध्यक्षा स्नेहा बागडे, प्रदीप बेंडल यांनी आपल्या समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.आजच्या पक्षप्रवेशामुळे नवे चेहरे आपल्याला मिळाले आहेत. जुन्या-नव्या नेत्यांचा योग्य समन्वय घडवून पक्ष वाढीचे काम आपल्याला करायचे आहे, असं ही अजित पवार म्हणाले. (Guhagar Mayor Rajesh Bendal joins NCP with supporters)

कोकणात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी अनेक निर्णय घेतले. कोकण रेल्वे होण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घेतला. साहेबांचे कोकणावर अपार प्रेम आहे. कोकणाचा कुठलाही प्रश्न आला तर कोकणवासियांना सहकार्याची भावना ठेवा अशी पवारसाहेबांची आम्हाला सूचना असते, असेही अजित पवार म्हणाले.

‘कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट झाली पाहिजे’

कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाला पाहिजे, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे चिपळूण, दापोली, गुहागर या पट्ट्यातील अनेक नेते, कार्यकर्ते पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असते. पुढील आठवड्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कोकणात येणार आहे. त्यावेळी कोकणातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करु असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढेल – तटकरे

आजच्या पक्षप्रवेशामुळे गुहागर, चिपळूण भागात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. कुणबी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी आदरणीय पवार यांची भेट घेतली होती. अनेक वर्ष कुणबी समाजाचे नेतृत्व करुनही अनेक नेत्यांनी समाजासाठी काहीच केले नव्हते. मात्र, पवार साहेबांची भेट घेतल्यानंतर साहेबांनी समाजाला आश्वस्त केले. शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलुंड येथे कुणबी समाजाच्या वसतीगृहासाठी पाच कोटींचा निधी दिल्याचेही खासदार सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.

भास्कर जाधवांना दिला होता दणका!

2009 च्या गुहागर विधानसभा निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांच्या प्रचारात राजेश बेंडल यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. मात्र, 2017 नंतर आमदार भास्कर जाधव आणि रादेश बेंडल यांच्यात विसंवाद सुरु झाला. त्यानंतर बेंडल काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. 2018 मध्ये गुहागर नगर पंचायत निवडणुकीपूर्वी बेंडल यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शहरविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपंतायतीत एकहाती सत्ता मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एक नगरसेवक निवडून आला. त्याचं शल्य आजही भास्कर जाधवांच्या मनात आहे. पुढे विधानसभा निवडणुकीदरम्यान जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

तटकरेंचा सल्ल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, सप्टेंबर महिन्यातच खासदार सुनील तटकरे यांनी गुहागर दौऱ्यावर असताना राजेश बेंडल यांना लवकरच अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करुन घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय व्हा, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता बेंडल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

इतर बातम्या :

विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा

समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, नवाब मलिकांचा जाहीर कार्यक्रमात इशारा

Guhagar Mayor Rajesh Bendal joins NCP with supporters

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.