‘इधर उधर की बाते मत कर, काफिला कैसे लुटा ये बता’, हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना टोला

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हा सामना चांगलाच रंगलाय (Hasan Mushrif criticize Chandrakant Patil).

'इधर उधर की बाते मत कर, काफिला कैसे लुटा ये बता', हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना टोला

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हा सामना चांगलाच रंगलाय (Hasan Mushrif criticize Chandrakant Patil). दोघांकडून एकमेकांवर शेलक्या शब्दात सुरु असणारी टीका चर्चेचा विषय बनली आहे. आता पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष करत टोला लगावला आहे. ‘इधर उधर की बाते मत कर, काफिला कैसे लुटा ये बता’ असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

चंद्रकांत दादा पाटील यांनी कोरोना काळात सरकारने केलेल्या बदल्या म्हणजे कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याची टीका केली होती. त्यांनी या बदल्यांच्या चौकशीचीही मागणी केली. याला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या काळात झालेल्या बदल्या पाहता चंद्रकांत पाटील यांची मागणी म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ अशी टीका केली.

यावर चंद्रकांत पाटील यांनीही मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली. बदल्यांचा विषय सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित आहे. असं असतानाही ग्रामविकास मंत्र्यांनी यावर बोलणं म्हणजे “आ बैल मुझे मार” असा प्रकार असल्याचं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

आता बदल्यांबरोबरच 15 व्या वित्त आयोगवरुनही हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. यावर बोलताना आज (24 ऑगस्ट) मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘इधर उधर की बाते मत कर, काफिला कैसे लुटा ये बता’ म्हणत चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं. आता चंद्रकांत पाटील याला कोणत्या शैलीत उत्तर देतात हे पहावे लागणार आहे.

‘खोरं आपल्याकडं माती ओढणारच’

नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभेवेळी कागल तालुक्याला सर्वाधिक निधी दिल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला. तसेच ग्रामविकास विभाग फक्त कागल पुरता मर्यादित आहे का? असा सवालही भाजप सदस्यांनी विचारला.

यावर हसन मुश्रीफ यांनी मार्मिक शब्दात उत्तर दिलंय. गेल्या 5 काय 20 वर्षात मिळाला नाही इतका निधी आपण जिल्ह्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत आणलाय. आता खोरं आपल्याकडे माती ओढणारच असं म्हणत त्यांनी कागलला दिलेल्या निधीचं समर्थन केलं.

संबंधित बातम्या :

‘तुम्ही काही केलंच नाही तर झोंबतं कशाला?’, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात शाब्दिक चकमक

चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी, अन्यथा बदनामीचा दावा दाखल करणार : हसन मुश्रीफ

ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीवर कोर्टाने दणका दिल्याचे वृत्त खोटे, हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

Hasan Mushrif criticize Chandrakant Patil

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI