AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली, फडणवीसांना सत्यता तपासण्यास सांगितलं, पवारांचा मोठा गौप्यस्फोट

भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा असं मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसतं. म्हणून मी फडणवीसांकडे ही तक्रार दिली होती.

VIDEO: भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली, फडणवीसांना सत्यता तपासण्यास सांगितलं, पवारांचा मोठा गौप्यस्फोट
भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली, फडणवीसांना सत्यता तपासण्यास सांगितलं, पवारांचा मोठा गौप्यस्फोटImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 12:00 PM
Share

मुंबई: भाजपच्या (bjp) एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा असं मी देवेंद्र फडणवीसांना(devendra fadnavis) सांगितलं होतं. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसतं. म्हणून मी फडणवीसांकडे ही तक्रार दिली होती. त्यावर फडणवीसांकडून तुम्ही सांगितलेल्या तक्रारीत मी लक्ष घातलं आहे. या पुढे असं होणार नाही याची काळजी घेऊ असं मला कळवलं गेलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी सांगितलं. शरद पवार यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी भाजपचा हा नेता कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला होता. गिरीश महाजन यांच्याविरोधात सरकारी वकीलच कसा कट रचत आहे याची माहिती फडणवीस यांनी दिली होती. त्यावर शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.

वर्ष सहा महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबत माझ्याकडे तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं त्यात सत्यता किती तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर त्यांच्याकडून मला एवढंच कळलं की तुम्ही सांगितलेल्या लोकांच्या तक्रारीत मी लक्ष घातलं. अशाप्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत याची काळजी घेईल, असं फडणवीसांकडून मला कळवलं गेलं. त्यामुळे हा प्रश्न माझ्याबाबत तिथेच संपला, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

125 तास रेकॉर्डिंग करणं कौतुकास्पद

ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत 125 तासांची रेकॉर्डिंग करण्यात फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. 125 तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंगचं काम करण्याचं काम खरंच झालं असेल तर त्यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे एखाद्या राज्यात जाऊन, राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तास न् तास रेकॉर्डिंग करायला ते यशस्वी झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकार चौकशी करेल

ही रेकॉर्डिंग खरी आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता, असत्यता तपासेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतं. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Fadanvis Video Bomb | शक्तीशाली तपास यंत्रणांचा वापर केल्याशिवाय 125 तास रेकॉर्डिंग अशक्य; शरद पवार यांचा दावा

Maharashtra News Live Update : भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली, फडणवीसांना सत्यता तपासण्यास सांगितलं, पवारांचा मोठा गौप्यस्फोट

‘मी वसंतराव’नंतर केदार शिंदे यांच्या नव्या सिनेमाची घोषणा, ‘बाईपण भारी देवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.