AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरच्या वाट्याच्या पाण्याचा एक थेंबही इंदापूरला गेला तर राजकारणातून संन्यास घेईन: दत्तात्रय भरणे

सोलापूरच्या वाटणीच्या पाण्याचा एक थेंबही इंदापूरला जाणार नाही, या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. | Solapur and Indapur water issue Dattatray Bharane

सोलापूरच्या वाट्याच्या पाण्याचा एक थेंबही इंदापूरला गेला तर राजकारणातून संन्यास घेईन: दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री
| Updated on: May 01, 2021 | 7:35 AM
Share

सोलापूर: उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाणीसाठ्यातील एक थेंबही इंदापूरला गेला तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी केले. सोलापूरच्या वाटणीच्या पाण्याचा एक थेंबही इंदापूरला जाणार नाही, या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. त्यानंतरही सोलापूर जिल्ह्याला डावलून इंदापूरला पाणी दिले तर मी मंत्रिपद आणि आमदारकी सोडून राजकारणातून संन्यास घेईन, असे भरणे यांनी म्हटले. (NCP leader Dattatray Bharane on water issue between Solapur and Indapur)

ते शुक्रवारी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’, हा माझा जुना व्हीडिओ मोडतोड करून वापरला जात असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री सोलापूरमध्ये एक बोलतात आणि इंदापूरला एक बोलतात,  असा गैरसमज पसरविला जात आहे. काही राजकीय लोक विनाकारण गैरसमज पसरवत आहेत, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.

सोलापूरचं पाणी आधी बारामती, आता इंदापूरला पळवलं, राष्ट्रवादी पाणी चोर, भाजपचा हल्ला; वाचा काय आहे वाद

सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला आहे.

या कृत्याचा निषेध म्हणून सोलापुरात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पाणी बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीने येत्या 1 मे रोजी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी पळवल्याने जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रही निम्मे कमी होऊ शकते. या विरुध्द जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार व आमदारांनी या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

हर्षवर्धन पाटील यांना धक्का, खंद्या समर्थकाने सर्व पदं सोडली, भरणेंचे कार्यकर्ते घरी!

सोलापूरचं पाणी आधी बारामती, आता इंदापूरला पळवलं, राष्ट्रवादी पाणी चोर, भाजपचा हल्ला; वाचा काय आहे वाद

मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही, त्याचा उपयोग सर्वसामान्यांना व्हायला हवा : दत्तात्रय भरणे

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.