.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोप-प्रत्यारोपाच्या गोंधळात शिंदे सेना लागली कामाला, ‘या’ मतदारसंघासाठी कार्यकरिणीची निवड

गटामध्ये आमदार, खासदार यांचे होणारे इमकमिंग आणि वाढत चाललेली ताकद याला मूर्त स्वरुप देण्यासाठी संघटनात्मक बदलही केले जात आहेत.

आरोप-प्रत्यारोपाच्या गोंधळात शिंदे सेना लागली कामाला, 'या' मतदारसंघासाठी कार्यकरिणीची निवड
शिंदे गटाचे यशवंत जाधव पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देताना.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 18, 2022 | 2:52 PM
Share

मुंबई : शिवसेना कुणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरु असले तरी दुसरीकडे (Eknath Shinde) शिंदे गट कामालाही लागला आहे. आतापर्यंत या गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही अधिक होती. आता (Organization Strengthening) संघटना मजबुतीकरणावरही भर दिला जात आहे. याची सुरवात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातूनच करण्यात आली आहे. (Bhaykhala) भायखळा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. याच मतदारसंघात विधानसभेसाठी कार्यकरणी जाहीर करण्यात आली आहे. यशवंत जाधव यांनी कार्यकरणी जाहीर केली असून यामध्ये महिला आणि पुरुषांचाही समावेश आहे.

शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने संघटना मजबूत करण्यावरही भर दिला आहे. गटामध्ये आमदार, खासदार यांचे होणारे इमकमिंग आणि वाढत चाललेली ताकद याला मूर्त स्वरुप देण्यासाठी संघटनात्मक बदलही केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भायखळा विधानसभा कार्यकरणी जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा कार्यकरणीच्या संघटक पदी विजय लपारे यांची निवड झाली आहे. लपारे हे यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय आहेत. कार्यकरणीमध्ये महिला आणि पुरुष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संघटनात्मक स्थरावर देखील शिंदे गट काम करणार आहे.

विधानसभा समन्वयक संतोष राणे, विधानसभा संघटक विजय लिपारे, विधानसभा सह समन्वयक प्रशांत आडारकर, विधानसभा सह समन्वयक हेमंत मयेकर, विधानसभा सह संघटक राजा म्हात्रे ( शाखा क्रमांक 207-208), विधानसभा सहसंघटक फईम शेख (शाखा क्रमांक 211- 212),

उपविभागप्रमुख परेश कुवेसकर ( शाखा 208-211), भारत पाटील (209-210), देवेंद्र कदम (207-212), विधानसभा उपसमन्वयक दिलीप वागस्कर, निसार काझी, संकेत सांगळे, राजेश जुमलेदार, शाखाप्रमुख नागेश धाटावकर (शाखा 207), विजय शिंदे (208),

सुधीर कीर (209), राकेश खानविलकर (210), आमिर अन्सारी (211), शाखा समन्वयक गौरव कासले (208), गणेश पाटील (210), रोहित रहाटे (211), उस्मान गायकवाड (212) यांचा समावेश असणार आहे.

महिला पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा समन्वयक कांता मयेकर, विधानसभा संयुक्त समन्वयक श्रद्धा हुले, महिला विधानसभा सहसमन्वयक पुष्पलता वस्त, विधानसभा संघटक ममता पालव, सहसंघटक प्राची कदम (शाखा 207/ 208), शेजल गमरे ( शाखा 209/210),

मुस्कान शेख (211-212), महिला शाखा संघटक स्मिता अडसुळे ( शाखा 207), जश्रद्धा पवार (208) अश्विनी खटावकर (209), मेघा भोईर (210), रुमाना शहा (211), महिला शाखा समन्वयक मनीषा जाधव (208)

अश्विनी खटावकर (209), मेघा भोईर (210), रुमाना शहा (211), महिला शाखा समन्वयक मनीषा जाधव (208), जया गांगुर्डे (209), वैशाली मुरुडकर (210), संपदा काजरोळकर (212) तर अरुणा यादव महिला विधानसभा उपसमन्वयक असणार आहेत.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर