17 वर्षांच्या विरोधानंतर पुन्हा ‘गोडी’, साखर संघाच्या माजी अध्यक्षांचे शरद पवारांशी मनोमीलन

मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी पृथ्वीराज जाचक यांनी दुपारचे जेवण घेतले.

17 वर्षांच्या विरोधानंतर पुन्हा 'गोडी', साखर संघाच्या माजी अध्यक्षांचे शरद पवारांशी मनोमीलन
Follow us
| Updated on: Aug 03, 2020 | 5:32 PM

इंदापूर : इंदापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी पाहायला मिळत आहे. तब्बल 17 वर्षांच्या विरोधानंतर साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (Indapur Senior Leader Prithviraj Jachak reunites with Sharad Pawar)

इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार-जाचक भेट झाल्याची चर्चा आहे. मुंबईत शरद पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ झाल्याचे पाहायला मिळाले.

पृथ्वीराज जाचक हे सहकार क्षेत्रातील दिग्गज, मात्र काही वर्षांपूर्वी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून दुरावले होते. परंतु ते आता पुन्हा राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेने सरकताना दिसत आहेत. मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी जाचक यांनी दुपारचे जेवण घेतले.

हेही वाचा : सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन

ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी गेल्या काही महिन्यांपासून मनोमिलनासाठी पुढाकार घेतला होता. साखर उद्योगातील अडचणींबाबत आजच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती पृथ्वीराज जाचक यांनी दिली. तर महत्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा किरण गुजर यांनी केला.

…आणि संबंध बिघडले

छत्रपती सहकारी साखर कारखान्यात डावलले जात असल्याच्या भावनेतून पृथ्वीराज जाचक यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली होती. ही कटुता इतकी वाढली की, जाचक यांनी त्यावेळी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना थेट आव्हान दिले होते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कालांतराने विरोध मावळला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करण्यासाठी हात पुढे केला. पृथ्वीराज जाचक यांनी मान्यता दिली आणि शरद पवार यांच्यासोबत भेटीनंतर पुनर्मिलनावर शिक्कामोर्तब झाले.

यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबत संकेत दिले होते. मात्र आता पवार-जाचक भेटीमुळे इंदापुरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Indapur Senior Leader Prithviraj Jachak reunites with Sharad Pawar)

Non Stop LIVE Update
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.