AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu-Kashmir: उरी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; जम्मू काश्मिरमध्ये घुसखोरी सुरुच; पहाटेपासून गोळीबार

जम्मू काश्मिरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले आहेत. उरी सेक्टरमध्ये दहशतवादी घुसल्याचे समजताच शोध मोहीम राबवण्यात आली, भारतीय सैन्यांकडून शोधमोहीम राबवण्यात आल्याने दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला.

Jammu-Kashmir: उरी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; जम्मू काश्मिरमध्ये घुसखोरी सुरुच; पहाटेपासून गोळीबार
| Updated on: Aug 26, 2022 | 9:53 AM
Share

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये (Jammu Kashmir Uri Sector) तीन दहशतवाद्यांना  भारतीय सैन्यांनी कंठस्नान (Three terrorists killed) घातले आहे. आज पहाटेपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये या परिसरात जोरदार चकमक सुरू असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवायांना ऊत आला असून भारतीय सैन्यांकडूनही जोरदार कारवाई सुरू आहे. नेहमी होणाऱ्या घुसखोरीमुळे भारतीय जवानांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला असून दहशतवाद्यांकडून वारंवार गोळीबार केला जात असल्याने या परिसरातील परिस्थिती तणावपूर्ण बनलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मिरमध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले असून दहशतवाद्यांच्या कारवायाही वाढल्या असल्याने भारतीय सैन्यांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. पाच दहशतवादीनी (Infiltration of Five terrorists)  सीमारेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न केला गेला असल्याने आणि भारतीय सैन्यांवर गोळीबार झाल्याने प्रत्त्यत्तर दाखल करण्यात आलेल्य गोळीबारात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

उरी सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

गेल्या काही दिवसांपासून उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न होत असून त्यांच्या कारवाया मोडून काढण्यात येत आहे. भारतीय सैन्यांनी परिसरात घुसरीचा प्रयत्न करण्यात येत असल्याने दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. काही तासांपूर्वी भारतीय सैन्यांना उरी सेक्टरमध्ये दहशतवादी घुसल्याची खबर मिळाली होती, त्यामुळे या ठिकाणी शोध मोहीम राबवतानाच दहशतवाद्यांनी सैन्यांवर अंधाधूंद गोळीबार चालू केला, त्यामुळे भारतीय जवानांनही जोरदार प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

पहाटेपासून लष्कर-दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू काश्मिरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले आहेत. उरी सेक्टरमध्ये दहशतवादी घुसल्याचे समजताच शोध मोहीम राबवण्यात आली, भारतीय सैन्यांकडून शोधमोहीम राबवण्यात आल्याने दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी गोळीबार चालू करताच भारतीय सैन्यांनीही त्यांच्यावर गोळीबार सुरू केला, त्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पाच दहशतवाद्यांची घुसखोरी

मागील काही तासांपासून उरी सेक्टरमध्ये दहशतवादाविरोधात भारतीय सैन्यांकडून जोरदार कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. भारतीय जवानांना उरी सेक्टरमध्ये 5 दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर काही वेळानी दहशतवाद्यांनी गोळीबार चालू केल्यानंतर प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.