सांगली जिल्हा बँकेचे ‘सीईओ’ कडू पाटलांचा राजीनामा, संचालक मंडळाच्या गटबाजीला कंटाळून निर्णय घेतल्याची चर्चा

सांगली जिल्हा बँकेचे 'सीईओ' कडू पाटलांचा राजीनामा, संचालक मंडळाच्या गटबाजीला कंटाळून निर्णय घेतल्याची चर्चा
जयवंत कडू पाटील

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जयवंत कडू पाटील यांनी आज राजीनामा दिला आहे. एकरकमी कर्जफेड योजना, कर्ज निर्लेखित करण्यासह व्याजमाफीचा निर्णय शनिवारी होणाऱ्या ऑनलाईन सभेत होण्याची शक्यता होती. तत्पूर्वी, ‘सीईओ’ कडू-पाटील यांनी राजीनामा दिल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

शंकर देवकुळे

| Edited By: अजय देशपांडे

Mar 16, 2022 | 1:24 PM

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जयवंत कडू पाटील (Jaywant Kadu Patil) यांनी आज राजीनामा (resigns) दिला आहे. एकरकमी कर्जफेड योजना, कर्ज निर्लेखित करण्यासह व्याजमाफीचा निर्णय शनिवारी होणाऱ्या ऑनलाईन सभेत होण्याची शक्यता होती. तत्पूर्वी, ‘सीईओ’ कडू-पाटील यांनी राजीनामा दिल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, राज्य शिखर बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक शिवाजी वाघ यांची आता ‘सीईओ’पदी नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेत शैलेश कोथमिरे प्रशासक असताना कडू-पाटील यांनी चांगले काम केले होते. मात्र त्यानंतर ते दुसऱ्या बँकेत कार्यरत झाले. परंतु 2020 मध्ये  जिल्हा बँक अडचणीत येऊ लागल्याने त्यांना जानेवारीमध्ये पुन्हा बोलावण्यात आले. त्यांची मुदत डिसेंबर 2021 पर्यंत होती. कोरोना, वसुलीसाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र मुदतवाढ दिल्यानंतर देखील त्यांना पदावरू हटविण्यासाठी काही जणांकडून हालचालींना सुरुवात झाली होती.

संचालक मंडळात दोन गट

संचालक मंडळात दोन गट पडल्याने राजीनामा न देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला. काही संचालकांनी त्यांना भर बैठकीतून पळवून नेऊन राजीनामा न देण्यास दबाव टाकला, यातूनच त्यांना मुदतवाढ मिळाली. पण, दुसऱ्या गटाचा त्यांना मोठा विरोध होता. जयवंत कडू पाटील हे प्रचंड तणावाखाली काम करत होते. अखेर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

अध्यक्षांशी चर्चा करून सोडणार पदभार

गेल्या काही दिवसांपासून हा विषय बँक संचालकांच्या ऐरणीवर होता.नवीन सीईओंची नियुक्ती होईपर्यंत कडू पाटील यांना कामाचे आदेश दिले होते. मात्र, बड्या कर्जदारांची वन टाईम सेटलमेंट, राईट ऑफ यावरून संचालक मंडळात वादंग सुरू आहेत. जिल्ह्याच्या बँकिंग वर्तुळातही याची मोठी चर्चा सुरू असताना सीईओ कडू पाटील यांनी आज राजीनामा दिला. याबाबत कडू पाटील यांना विचारले असता त्यांनीही राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक हे विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे मुंबईत आहेत.ते दोन दिवसांत सांगलीत येतील. त्यांच्याशी चर्चा करून कडू पाटील हे आपला पदभार सोडणार आहेत.

संबंधित बातम्या

अकोला शिवसेनेत मदभेद? जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?

TV9 Poll : गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल?; वाचा पोल काय सांगतो?

राणे पिता-पुत्राला न्यायालयाचा दिलासा, अटी, शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें