भाजपमध्ये जाण्यासाठी कोणत्या नेत्याशी चर्चा केली ते जाहीर कराच; जयंत पाटलांचं राणेंना आव्हान

महाविकास आघाडीची सत्ता आली नसती तर जयंत पाटील हे भाजपमध्ये आले असते हा भाजप नेते नारायण राणे यांनी केलेला दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. (Jayant Patil clarification on Narayan Rane's statement)

भाजपमध्ये जाण्यासाठी कोणत्या नेत्याशी चर्चा केली ते जाहीर कराच; जयंत पाटलांचं राणेंना आव्हान
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 7:55 PM

मुंबई: महाविकास आघाडीची सत्ता आली नसती तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज भाजपचे मंत्री असते. ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे केली होता. जयंत पाटील यांनी राणेंचा हा दावा फेटाळून लावला असून भाजपमध्ये जाण्यासाठी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली नसल्याचा खुलासा केला आहे. (Jayant Patil clarification on Narayan Rane’s statement)

जयंत पाटील यांनी ट्विट करून नारायण राणेंचे आरोप फेटाळतानाच मी कोणत्या भाजप नेत्यांशी चर्चा केली ते जाहीर कराच, असं आव्हानही दिलं आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते, ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे.

माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो, असं सांगतानाच नारायण राणे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल, असं आव्हानही त्यांनी राणेंना दिलं आहे.

राणे काय म्हणाले होते?

  • जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामापुरात जाऊन उत्तर देणार. पुढचे सरकार आमचेच येणार हे बोलण्याऐवजी जयंत पाटील पुढील सरकारमध्ये मीच मंत्री असेन असं बोलले असतील. आज जर महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती. हे सर्व मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उघड करणार आहे.

जयंत पाटील काय म्हणाले होते?

  • गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते.
  • भाजप नेहमीच वेगवेगळे स्टेटमेंट देऊन सरकार पडण्याच्या धमक्या देत असते. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यात त्यांना यश मिळत नाही. संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे.

संबंधित बातम्या:

सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा

महाराष्ट्रात येताय, पण उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेकडेही लक्ष द्या, योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर काँग्रेसचा निशाणा

गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं; जयंत पाटलांची राणेंवर खोचक टीका

(Jayant Patil clarification on Narayan Rane’s statement)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.