मुलगीही बापाला आपला मोबाईल दाखवत नाही, मोदी आपलं सगळं पाहात आहेत : जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे (Jitendra Awhad called Hitler to PM Modi).

मुलगीही बापाला आपला मोबाईल दाखवत नाही, मोदी आपलं सगळं पाहात आहेत : जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे (Jitendra Awhad called Hitler to PM Modi). सध्याच्या काळात मुलगी देखील बापाला आपला मोबाईल दाखवत नाही. दुसरीकडे मोदी मात्र आपलं सगळं पाहायला लागले आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला (Jitendra Awhad called Hitler to PM Modi).

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “यापुढे मोदी आपलं सगळं पाहायला लागतील. त्यांना दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहायला खूप आवडतं. आता मुलगी सुद्धा आपल्या बापाला आपला मोबाईल दाखवत नाही, तर मग माझ्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला?”

हे लोक पाहून स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झाली आहे, असं वाटतं. ही लढाई मुस्लिमांची नाही. हा फक्त मुस्लिमांचा प्रश्न आहे असं दाखवून हिंदूंना गाफील ठेवलं जातंय. हा देश कुणाच्या बापाचा नाही. आसाममध्ये 14 लाख हिंदू पकडले गेले. हिंदूंमध्ये 6700 जाती अशा आहेत ज्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी एकही दाखला देण्याची स्थिती नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या दोन्ही कायद्यांविरोधातील ही लढाई आंबेडकरी विचारधारा जीवंत राहणार की गोळवलकरांचे विचार जीवंत राहणार हे ठरवेल. सध्या मनुस्मृतीला जीवंत करणाऱ्या गोळवलकरांचे सुवर्ण दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

देशात 20 कोटी मुस्लिम आहेत. 10 टक्के जरी बेकायदेशीर निघाले तर 2 कोटी नागरिक बेकायदा ठरवले जातील. 100 कोटी हिंदूतून 10 टक्के बेकायदेशीर निघाले, तर 10 कोटी नागरिक बेकायदेशीर ठरतील. याचा सर्वात जास्त फटका हिंदूंनाच बसणार आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.

“मोदी हिटलरचा अवतार”

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटरलाच अवतार असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते म्हणाले, “1935 साली हिटलरने देखील असाच नागरिकत्व कायदा आणला होता. त्यानंतर कोट्यवधी ज्यू नागरिकांना मारलं गेलं. मोदींनी आता तोच कायदा आणला आहे. मोदी थेट हिटलरचा अवतार आहे.” आज मोदी दंगेखोरांना असं करु, तसं करू असा इशारा देत आहेत. त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही हत्यार न घेता इंग्रजांना पळवून लावलं होतं, असंही आव्हाड यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI