AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय : आव्हाड

राष्ट्रवादीचे आमदार आपापल्या घरी आहेत, कारण त्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केला आहे, असं ट्वीट आव्हाडांनी केलं आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय : आव्हाड
| Updated on: Nov 08, 2019 | 3:50 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असून आमदारांना फोडाफोडीसाठी संपर्क केला जात असल्याचा आरोप होत आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चिमटे काढले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आपापल्या घरी आहेत, कारण त्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केला आहे, असं ट्वीट आव्हाडांनी (Jitendra Awhad on Horse Trading) केलं आहे.

‘शिवसेना आमदार – रंगशारदा, काँग्रेस आमदार – जयपूर, राष्ट्रवादी आमदार – आपआपल्या घरी, कारण सगळ्यांना उदयन राजेंचा फोटो मेसेज करून ठेवलाय. हा मेसेज करणाऱ्याला सलाम’ असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. सोशल मीडियावर फॉरवर्ड झालेला मेसेज आव्हाडांनी शेअर केलेला दिसत आहे.

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना रंगशारदाला बोलावलं असून तिथून सर्व जण एकत्र एखाद्या ठिकाणी रवाना होणार आहेत. तर काँग्रेसचे आमदारही जयपूरला गेल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे आमदार एखाद्या अज्ञातस्थळी गेल्याचं मात्र कोणतंही वृत्त नाही.

जे आमदार फुटायचे होते, ते निवडणुकीआधीच गेले. आता राष्ट्रवादीला आमदार फुटण्याची भीती नाही, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं होतं.

राष्ट्रवादीच्या तिकीटावर साताऱ्यातून खासदारपदी निवडून आलेल्या उदयनराजेंनी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपच्या गोटात सहभागी झाले. परंतु पोटनिवडणुकीत जनतेने त्यांना नाकारलं. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील साताऱ्याच्या खासदारपदी निवडून आले असून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे उदयनराजेंसोबत जे घडलं, ते आपल्यासोबत होऊ नये, या भीतीतून एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासच एकप्रकारे आव्हाडांनी फॉरवर्ड मेसेज (Jitendra Awhad on Horse Trading) पोस्ट करत व्यक्त केला आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?

नाशिकमधील इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार हिरामण खोसकर यांना भाजपने ऑफर दिल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

शिवसेना आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर : वडेट्टीवार

काही आमदारांशी संपर्क करुन प्रलोभन द्यायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटी रुपयांची खुली ऑफर दिल्याचं मी टीव्ही चॅनलवर पाहिलं. त्यानंतर आमच्या आमदारांनाही संपर्क करण्यात आला, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

अशाप्रकारे मित्रपक्षाच्या आमदारावरच त्यांचा डोळा आहे. याचा अर्थ ते काहीही करु शकतात. त्यांनी आमच्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट 100 टक्के खरी आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं होतं.

हा सत्तेचा घोडेबाजार उघड झाला पाहिजे म्हणून मी आमदारांना सांगितलं फोन टॅप करा. हे पुरावे जनतेसमोर दाखवायचे आहेत, असंही वडेट्टीवार म्हणाले होते.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.