‘हे तर लुटारू, डाकूंचं सरकार; वसूली आदेश देणाराही गायब आणि वसूली गोळा करणाराही गायब’, सोमय्यांचा घणाघात

ठाकरे सरकार हे लुटारू आणि डाकूंचं सरकार आहे. वसूली करण्याचा आदेश देणारे मंत्री गायब आणि वसूली गोळा करणारे परमबीर गायब. परमबीरची नियुक्ती ठाकरेंनी केली आणि अनिल देशमुखांची नियुक्ती पवारांनी केली. आता दोघेही गायब, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंवर हल्ला चढवला.

'हे तर लुटारू, डाकूंचं सरकार; वसूली आदेश देणाराही गायब आणि वसूली गोळा करणाराही गायब', सोमय्यांचा घणाघात
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 8:09 PM

पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर सोमय्यांनी निशाणा साधला. ठाकरे सरकार हे लुटारू आणि डाकूंचं सरकार आहे. वसूली करण्याचा आदेश देणारे मंत्री गायब आणि वसूली गोळा करणारे परमबीर गायब. परमबीरची नियुक्ती ठाकरेंनी केली आणि अनिल देशमुखांची नियुक्ती पवारांनी केली. आता दोघेही गायब, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंवर हल्ला चढवला. (Kirit Somaiya criticizes Deputy CM Ajit Pawar, MP Bhavana Gawli, MP Sanjay Raut )

महाविकास आघाडी सरकार हे पोलिसांचा उपयोग माफियागिरी करण्यासाठी करत आहे. भावना गवळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवतात. सात कोटी रुपये कार्यालयात कुठून आले? कोर्टानं आदेश दिलेत, 25 कोटीची चोरी केलीय. काही दिवसांत भावना गवळी आर्थर रोड कारागृहात जाणार, असा दावा सोमय्या यांनी केलाय.

‘संजय राऊतांनी चोरीचा माल परत केला’

सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय. आमचे संजयभाऊ किती ओरडतात. सामनात संपादकीय लिहितात. ईडीनं बोलावल्यावर ईडी बिडी वळवणार. एक समन्स, दोन समन्स, संजय राऊतांना घाम फुटला. संजय राऊत मागच्या दारानं ईडी कार्यालयात गेले, 55 लाखाचा चेक परत केला. संजय राऊतांनी चोरीचा माल परत केला, अशी टीका सोमय्यांनी केलीय.

किरीट सोमय्यांचा अजित पवारांवर सनसनाटी आरोप

मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटलंय की जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झालाय. त्याची चौकशी झाली पाहिजे असा आदेश इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ महाराष्ट्र पोलीस आणि ईडीला दिले. जरंडेश्वर साखर कारखाना जेव्हा घेतला तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. यात राज्य सरकारचे पैसे आहेत. अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारला पैसा जातो. अजित पवारांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली, लिलाव केला आणि स्वत:च स्वत:च्या कंपनीला घेतला. सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलं. स्वत: घेतला तोही बेनामी घेतला. त्यांनी सगळ्या बाबींचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांनी पदावर राहता येणार नाही, अशा शब्दात सोमय्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केलीय.

‘खरं खोटं काय हे स्पष्ट करा’

गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. त्यावेळी पहिल्या दिवशी अजित पवार यांनी खूप मोठं भावूक वक्तव्य केलं की फक्त रक्ताचं नातं म्हणून बहिणींच्या घरावर धाडी टाकल्या. मला पुण्यातील माहिती असते पण परिवाराबाबत माहिती नसते. म्हणून माझा प्रश्न शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, पार्थ पवार आणि सुप्रिया सुळेंना आहे की, जरंडेश्वर साखर कारखान्याचा जो मालक आहे, मुख्य भागधारक त्यात एक नाव आहे मोहन पाटील ते विजया पाटील यांचे पती आहेत. दुसरे आहेत निता पाटील. मला अजित पवारांना प्रश्न विचारायचा आहे की हे लोक कोण आहेत? आता खरं खोटं काय आहे ते पवारांनी स्पष्ट करावं.

इतर बातम्या :

बीडसाठी कुणी काय केलं? पंकजा मुंडे म्हणतात आता एका शेतकऱ्याला 98 पैसे विमा आला!

पवारांनी सुनील शेळकेंचं मताधिक्य सांगितलं, तर दरेकरांनी नातवाची लीड दाखवली! ‘त्या’ घटनेनं पार्थ पवार पिछाडीवर?

Kirit Somaiya criticizes Deputy CM Ajit Pawar, MP Bhavana Gawli, MP Sanjay Raut

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.